आशाताई बच्छाव
शिवसेना महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक श्याम सिंह ठाकुर यांनी केला विधानसभा आमदार भावना ताई चा सत्कार.
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ –शिवसेना महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक पदी नवं नियुक्त झालेले श्याम सिंह ठाकूर यांनी केला भावनाताईचा अनसिंग येथे सत्कार सत्कार समारंभ तथा भूमिपूजनाचा कार्यक्रम होत असताना भावनाताई यांनी जमलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यांना येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्याची चालना देण्याकरिता भविष्यात विकासाच्या दृष्टीने आपण वाटचाल करीत आहोत येणाऱ्या काळात माननीय श्री मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्याकरिता आपल्याला संघटन मजबूत कसे करता येईल याच्यावर सुद्धा प्रकाश टाकला एकनाथ शिंदेसाहेब हे एक सच्चे बालासाहेबाचे शिवसैनिक आहेत आणि त्यांचे नेतृत्वात महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम घडवायचा आहे 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण अशा प्रकारची शिवसेनेची नेहमीची भूमिका राहिली आहे असे प्रतिपादन भावनाताई गवळी यांनी या वेळेस सांगितले सोबतच नवनिर्वाचित श्याम सिंह ठाकुर शिवसेना महाराष्ट्र राज्याचे मुख्य समन्वयक राजस्थान विभाग पदी नियुक्त झालेले यांनी भावनाताईचा सत्कार करता प्रसंगी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बोलता वेळेस सांगितले की जे भावनाताई हे अपराजित खासदार असून जनतेच्या सर्वसामान्यांच्या समस्या तळागाळापर्यंत समजून घेतात येणाऱ्या काळात समाजाच्या समस्या व विकासात दृष्टीने शिंदे साहेबांना महाराष्ट्राचे शीर्ष नेतृत्व चे हात बळकट करायचे आहे शिंदे साहेबानी जे विश्वास माननीय श्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ जी शिंदे साहेब यांनी माझ्यावर महाराष्ट्र मुख्य समन्वयक राजस्थानी विभागाची जी जबाबदारी माझ्यावर टाकली त्या जबाबदारीला मी नक्कीच प्राथमिकता देऊन शिंदे साहेबांचे आहात बळकट व यशस्वी प्रयत्न करत राहील मुंबई महानगरपालिका मध्ये राजस्थानचे स्थानिक हिंदी भाषिक 25 .9 टक्के आहेत यांची भूमिका महानगरपालिकेमध्ये फार मोलाची असते अशा या राजस्थानी समाजाचे मला मुख्य समन्वयक पदी साहेबांनी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी मुंबई सह पूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये 376 तालुक्यामध्ये नक्कीच त्यांनी टाकलेली माझ्यावर विश्वास हे यशस्वीरित्या पार पाडेल याप्रसंगी वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवसेना जिल्हाध्यक्ष विजुभाऊ खांनजोडे तथा उपाध्यक्ष महादेवराव सावके तालुका अध्यक्ष परम मुसळे सोबत अनसिंग येथील तालुका उपाध्यक्ष जगन कापसे रमेश कल्याणकर वाशीम येथून आमचे मित्र हुकुम भाऊ तुर्के युवा नेतृत्व सुरज भुसारे देवानंद काटेकर बाळू माल दत्ता भालेराव संजू भाऊ गाट्टनी कार्यक्रमास उपस्थित होते