आशाताई बच्छाव
अमराईतील ७० महिला पुरुषांचे मुख्याधिकारींना निवेदन
बैठकीत म्हणाले “मतदानावर बहिष्कार करा” • आम्हाला सोयींपासून वंचित का ठेवले.?.. “आम्हाला मागासलेले गावंढळ समजतात का.?”
संजीव भांबोरे
भंडारा – २०१६ ला नगरपरिषदेत मत मागून गेले तेव्हापासून येथे काहीच सुखसोयी केल्या नाहीत. आम्हाला काय “मागासलेले गावंढळ” समजतात का.? त्वरीत याची दखल घ्या, अन्यथा समोर नगरपरिषद निवडणुकीत कुणालाही मतदान करणार नाहीत असा पवित्रा महिलांनी बैठकीत घेतला. व सर्व मागण्यांचे निवेदन ( गुरू. २६ जून ) ला साकोली मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना सादर केले. आता प्रभाग क्रमांक १ पाठोपाठ अमराई शिवाजी प्रभागातील जनताही जागृत झाली असल्याचे या प्रकारावरून दिसून आले.
गडकुंभली रोड नविन तहसील मागे अमराई वस्ती ही फार जूनी साकोली. येथे शिवाजी वार्ड ०८ असून सन २०१६ ला फक्त प्रचार करायला आले आणि गोड बोलून मते घेऊन गेलेत. तेव्हापासून कुण्याही नगरसेवकाचा चेहरा येथे पुन्हा दिसला नाही. आम्हाला हे लोक “मागासलेले गावंढळ” समजतात का.? आता तर थेट आम्ही मतदानावरच बहिष्कार करणार. अशी संतापजनक प्रतिक्रिया महिलांनी अमराईत झालेल्या तातडीच्या बैठकीत दिली आहे. तिथून सरळ महिला पुरुष नगरपरिषदेत जाऊन या सर्व मागण्यांचे निवेदन सीओ मंगेश वासेकर यांना दिले. यामध्ये अतिक्रमणे पट्टे नियमाकुल करा, प्रभागात हायमास्ट लाईट त्वरीत लावा, पक्के सिमेंट रस्ते, नाली व पाण्याची सोय करा, लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक बालोद्यान करा, सार्वजनिक शौचालय निर्माण करा. अश्या ७ मागण्या असून याची पूर्तता तातडीने करावी. अन्यथा झालेल्या बैठकीत महिला संतापजनक भुमिकेत बोलल्या की “अमराईत कुणाला पाय ही ठेवू देणार नाही व नगरपरिषद निवडणुकीत बहिष्कार केला जाईल” असा संतप्त इशारा देण्यात आला आहे.
स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर करतांना अमराई निवासी सुरय्या वाघमारे, छाया बोरकर, फ्रिडमचे किशोर बावणे, अशोक सिरसाम, सुनीता वघारे, सचिन घोनमोडे, अर्चना गवारे, नाझिया पठाण, पुष्पा मानकर, योगिता मानकर, विद्या वघारे, भाग्यश्री वघारे, बलदेव हजारे, एस. एन. मेश्राम, निर्मला सिरसाम, गिता निखारे, अनंदा मानकर, इंदूबाई सोनवाने, प्रभा शिवणकर, वैशाली बडोले, गिता शहारे, सुनिता बोरकर, कुंदा राऊत, लिला गणवीर, रेणूका लांजेवार, मोरेश्वर तिडके, राजू सिरसाम, प्रभाकर लांजेवार, कार्तिक निखारे, प्रमिला राऊत, सुमन राऊत, मोनिका बारस्कर, रीना बोरकर यांसह ६५ ते ७० महिला पुरुषांच्या निवेदनात स्वाक्षऱ्या असून अमराई शिवाजी वार्डात बैठकीत ह्या महिला चांगल्याच संतप्त झालेल्या होत्या. आता श्रीनगर प्रभाग क्र. १, सिव्हिल वार्ड, प्रमाणे शिवाजी वार्ड अमराई मधील महिला पुरुष मतदार जनता चांगलीच जागृत झाली असल्याचे दिसून आले आहे.






