Home बुलढाणा पावसाने केली वाहतूक ठप्प! मेहकर, जानेफळ ते खामगाव मुख्य रस्त्यावर पूर !...

पावसाने केली वाहतूक ठप्प! मेहकर, जानेफळ ते खामगाव मुख्य रस्त्यावर पूर ! – लोणारमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस.. नदी नाले तुडुंब, डोणगावातही पावसाचा कहर ! कांचन नदी ओव्हरफ्लो, मालेगाव वाशिम रस्ता बंद !

145

आशाताई बच्छाव

1001639297.jpg

पावसाने केली वाहतूक ठप्प! मेहकर, जानेफळ ते खामगाव मुख्य रस्त्यावर पूर ! – लोणारमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस.. नदी नाले तुडुंब, डोणगावातही पावसाचा कहर ! कांचन नदी ओव्हरफ्लो, मालेगाव वाशिम रस्ता बंद !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा अतिवृष्टीमुळे जानेफळ- मेहकर व जानेफळ- खामगाव रस्त्यावरील नदी नाल्यांना पूर आल्याने मेहकर ते शेगाव जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
लोणारमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असून, डोणगावातही पावसाचा कहर आहे. नदी नाले तुडुंब भरले असून, अनेक गावांचे संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कांचन नदीला पूर आल्यामुळे मालेगाव वाशिम रस्ता बंद झाला आहे. लोणार शहरात व तालुक्यात मुसळधार पावसामुळे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वडगाव तेजनकर गावाला अक्षरक्षः झोडपले आहे. शिवाय संततधार पावसामुळे डोणगाव व ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे डोणगाव व ग्रामीण भागाचा संपर्क तुटल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मादणी, शेलगाव देशमुख, आरेगाव, बेलगाव, गोहेगाव, राजगड, जनुना, विठ्ठलवाडी, पांगरखेड, विशवी, कनका व इतर गाव खेड्याचा संपर्क तुटल्यामुळे तसेच नदी नाल्यांना पूर आल्यामुळे ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे डोणगाव येथील कांचन नदीला पूर आल्यामुळे मालेगाव वाशिम रस्ता बंद झाला आहे. या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे या संदर्भातील अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती.

Previous articleज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या वतीने उमरगा पोलिस स्टेशन येथे आरोग्य शिबीर संपन्न
Next articleड्रग्ज फ्री बुलढाणा !’ – अंमली पदार्थविरोधात बाईक रॅलीने वेधले लक्ष!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.