Home धाराशिव ज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या वतीने उमरगा पोलिस स्टेशन येथे आरोग्य शिबीर संपन्न

ज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या वतीने उमरगा पोलिस स्टेशन येथे आरोग्य शिबीर संपन्न

270

आशाताई बच्छाव

1001639279.jpg

ज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या वतीने उमरगा पोलिस स्टेशन येथे आरोग्य शिबीर संपन्न धाराशिव उमरगा : ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय, संस्था व
जी.के.फाउंडेशन पुणे, कमल मेडिकेअर कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी पोलीस ठाणे उमरगा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार , राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ कार्यवाह उमरगा डॉ.कपिल महाजन, गुंडाप्पा खडके अध्यक्ष जी.के.फांऊडेशन पुणे,युवा सेना विभागीय निरीक्षक मराठवाडा किरण गायकवाड, ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲड.आकांक्षा चौगुले, पोलिस निरीक्षक उमरगा आश्वीनी भोसले,व अंमलदार यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी 223 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी उमरगा,लोहारा,मुरूम पोलीसांसाठी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.