Home बुलढाणा किरीट सोमय्या अचानक बुलढाण्यात ! पत्रकार परिषदेत सोमय्या काय फोडतील बॉम्ब? -जिल्ह्याचे...

किरीट सोमय्या अचानक बुलढाण्यात ! पत्रकार परिषदेत सोमय्या काय फोडतील बॉम्ब? -जिल्ह्याचे लक्ष केंद्रित !

99

आशाताई बच्छाव

1001638572.jpg

किरीट सोमय्या अचानक बुलढाण्यात ! पत्रकार परिषदेत सोमय्या काय फोडतील बॉम्ब? -जिल्ह्याचे लक्ष केंद्रित !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा एकेकाळी भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज अचानक बुलढाणा येथे धडक दिली असून, त्यांच्या या दौऱ्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून माध्यमांपासून दूर असलेले सोमय्या पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत सक्रिय झाले आहेत. शासकीय विश्रामगृहावर आगमन झाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मात्र, सोमय्या यांचा दौरा सौजन्यभेटीसाठी नसून, जिल्ह्यातील बांग्लादेशी घुसखोरी व बनावट मतदारांच्या मुद्द्यावरच आहे, हे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमय्या हे आज जिल्हाधिकाऱ्यांसमवेत याच गंभीर विषयावर चर्चा करणार असून, प्रशासनाला ठोस कार्यवाहीसाठी सज्ज करणारी भूमिका घेणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार प्रकरणांच्या पाठपुराव्यामुळे सतत चर्चेत असलेले सोमय्या यांनी यापूर्वीही बुलढाणा जिल्ह्याला भेट दिली होती. मात्र आता बोगस मतदार आणि देशविरोधी घुसखोरीसारख्या मुद्द्यावर त्यांचा पुन्हा उद्रेक होत असल्याचे संकेत आहेत. जिल्ह्यातील काही मतदार यादींमध्ये संशयास्पद नावांचा समावेश असल्याचे भाजपचे निरीक्षण असून, यावरून सोमय्या प्रशासनाला जाब विचारणार आहेत. दुपारी पत्रकार परिषदेत सोमय्या काय भडिमार करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे!

Previous articleSBI बँक कडून गोंधनखेडा येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न..
Next articleज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या वतीने उमरगा पोलिस स्टेशन येथे आरोग्य शिबीर संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.