Home जालना SBI बँक कडून गोंधनखेडा येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न..

SBI बँक कडून गोंधनखेडा येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न..

91

आशाताई बच्छाव

1001638537.jpg

SBI बँक कडून गोंधनखेडा येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न..

जाफ्राबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

दिनांक 25 जून रोजी एसबीआय बँकेच्या वाणिज्यिक शाखा जाफराबाद यांनी शेतकरी संध्या शिबिर गोंधनखेडा या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. यावेळी कृषी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसह गावातील न उद्योजक तरुण माता भगिनी यांच्यासोबत. एसबीआय बँकेचे महाव्यवस्थापक श्रीराम सिंह. यांनी संवाद साधला या वेळेला त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की आपण जर रेगुलर कर्ज त्याठिकाणी भरले तर आपली बँकेमध्ये पत वाढते आणि आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला उद्योग उभारणीसाठी बँक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल. असे आदरणीय श्रीराम सिंह साहेब यांनी माहिती दिली. यांच्यासोबत उपमहाव्यवस्थापक विकास गुप्ता सर यांनी सुद्धा शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जाफराबाद शाखेचे प्रबंधक अरुण मानकर सर यांनी केले यावेळी बोलताना मानकर सर म्हणाले की बँकेबद्दलची भीती शेतकऱ्यांनी मनातून काढून टाकावी आणि आपल्या समस्या बँकेपर्यंत पोहोचाव्या आणि आपण बँकेचा चांगला व्यवहार वाढवून पारदर्शी कारभार केल्यास बँक आपल्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी प्रयत्नशील राहील. यावेळी मुख्य प्रबंधक शिवराम खेडूळकर सर. प्रबंधक केतन सर. अतुल तेलंग सर. कृषी क्षेत्रीय अधिकारी. नितीन लोखंडे सर फील्ड ऑफिसर. अमीर सय्यद सर. समाधान राऊत FOS. सामाजिक कार्यकर्ते गजानन वायाळ. बोर्डे सर. एस एन फाउंडेशनचे अध्यक्ष दुर्गेश बनकर . संचालक वैभव नवले. उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कृष्णा पाटील इंगळे यांनी केले तर आभार सरपंच विठ्ठल गोरे यांनी मानले.यासह शेतकरी. ग्रामस्थ.माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमुंबई–आग्रा महामार्गावर बॉम्बे इंदोर ट्रॅव्हल्स ला अचानक आग
Next articleकिरीट सोमय्या अचानक बुलढाण्यात ! पत्रकार परिषदेत सोमय्या काय फोडतील बॉम्ब? -जिल्ह्याचे लक्ष केंद्रित !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.