आशाताई बच्छाव
सौ. छाया भीमराव टेंभुर्णे यांना कालबद्ध
पदोन्नती पासून शासनाच्या आरोग्य विभागाच्या चुकीमुळे शारीरिक व मानसिक त्रास
पत्रकार संजीव भांबोरे यांनी कर्मचारी/ अधिकारी संघटनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष भीमराव टेंभुर्णे
यांच्याशी उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर येथे केलेली बातचीत
उपसंचालक शंभरकर यांच्या अनुपस्थित अभिजीत टेकाम पीए यांना निवेदन
संजीव भांबोरे
नागपूर –आज दिनांक 26 जून 2025 ला नागपूर येथील उपसंचालक कार्यालय समोर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे यांनी कर्मचारी/ अधिकारी संघटनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष भीमराव टेंभुर्णे यांच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली असता त्यांनी पत्नीवर अन्याय झाल्याचे आपबीती सांगितली .याबाबत सविस्तर वृत्त असे की.सौ .छाया. बी. टेंभुर्णे सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया ह्या दिनांक 30 नोव्हेंबर 2022 ला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या असून सन 2000 पासून 12 वर्षाची कालबद्ध पदोन्नती दिनांक 17/ 12/ 1998 ऐवजी दिनांक 13 सप्टेंबर 2000 ला दिली व दुसरी 24 वर्षांची कालबद्ध पदोन्नती दिनांक 17/ 12 /2010 ऐवजी 13 सप्टेंबर 2012 ला देण्यात आली. तसेच 30 वर्षाची कालबद्ध पदोन्नती नियमाप्रमाणे ज्या लाभ 17/ 12 /2016 ला नियमाप्रमाणे देण्यात आले.
सौ छाया बी. टेंभुर्णे सेवानिवृत्त सेवानिवृत्त अधीक्षक सामान्य रुग्णालय केटीएस गोंदिया यांनी अनेकदा पत्रव्यवहार करून व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना भेटून आज पावतो कोणत्याही प्रकारचा आपल्या कार्यालयाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांना संघटने कडे जावे लागले. त्यांनी शासनाची 36 वर्षे प्रामाणिकपणे सेवा करून स्वतःच्या हक्काचा लाभ मिळण्याकरता सेवानिवृत्तीनंतर त्यांना लाभ देण्यात आला नाही .संघटनेचे अध्यक्ष भिमराव टेंभुर्णे हे उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर यांना अनेकता भेटून व पत्रव्यवहार केला व प्रत्यक्ष अनेकदा त्यांची भेट घेतली परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही .कर्मचारी कोणाच्या भरोशावर मुजोरीपणा दाखवीत आहेत .शासनाकडून त्यांना कार्यालयात कशासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे कोणत्याच प्रकारचे कामे केली नसून निवृत्त कर्मचाऱ्यास आर्थिक व मानसिक मनस्ताप झाल्याचे प्रकृतीवर त्यांच्या विपरीत परिणाम झाल्यास आपल्या कार्यालयातील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना जबाबदार धरण्यात येईल
करिता वरील महिला निवृत्त कर्मचारी यांचे हक्काचे क्लेम मंजूर करून कर्मचारी, अधिकारी कल्याण संघ मंत्रालय मुंबई 32 शाखा भंडारा या संघटनेचा प्रोटोकॉल न पाळल्याने संघटनेला कोणत्या प्रकारचे सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे वरील प्रकरणात शासनाला विनंती करण्यात येत आहे की छाया भीमराव टेंभुर्णे यांचे क्लेम तात्काळ मंजूर करून त्यांच्या होणारा त्रास त्वरित थांबवावा अशी शासन व प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे. याबाबतचे निवेदन यापूर्वी उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग चंद्रपूर, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पालांदूर, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई, मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय नागपूर विभाग नागपूर, प्रधान सचिव सामान्य प्रशासन मंत्रालय, प्रधान सचिव प्रधान सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई ,आयुक्त सार्वजनिक सेवा पुणे , प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य सेवा मंत्रालय मुंबई, मुख्य सचिव वित्त विभाग हैदराबाद हाऊस हिवाळी अधिवेशन 24, लोकायुक्त मंत्रालय मुंबई, मुंबई राज्यपाल राजभवन मुंबई, यांना देण्यात आलेले आहे.