Home बुलढाणा EXCLUSIVE आमदार संजय गायकवाड यांचा निवडणूक याचिका फेटाळून लावण्याचा अर्ज! – अॅड....

EXCLUSIVE आमदार संजय गायकवाड यांचा निवडणूक याचिका फेटाळून लावण्याचा अर्ज! – अॅड. -जयश्री शेळकेंना हायकोर्टाने मागितले 18 जुलै पर्यंत उत्तर !

76

आशाताई बच्छाव

1001635675.jpg

EXCLUSIVE आमदार संजय गायकवाड यांचा निवडणूक याचिका फेटाळून लावण्याचा अर्ज! – अॅड. -जयश्री शेळकेंना हायकोर्टाने मागितले 18 जुलै पर्यंत उत्तर !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार संजय गायकवाड यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांची निवड अवैध ठरवून रद्द करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी याचीके द्वारे केली आहे. दरम्यान ही निवडणूक याचीका फेटाळून लावण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने सोमवारी या अर्जाची दखल घेऊन शेळके यांना
यावर 18 जुलै पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर प्रकरणावर न्या. अनिल किलोर यांच्या समक्ष सुनावणी झाली. आमदार गायकवाड यांनी शेळके यांच्या निवडणूक याचीके ला दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डर मधील नियम 11 आणि लोकप्रतिनिधत्व कायद्यातील कलम 86 (6) अंतर्गत विरोध केला आहे. त्यांचे वकील मोहित खजांची यांनी ही याचीका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 81 (3) मधील निकषांसह
विविध तरतुदींची पूर्तता करीत नाही, असे सांगून आमदार गायकवाड यांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यातच फेटाळून लावणे आवश्यक आहे, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तर निवडणूक आयोगाने ईव्हीएम द्वारे निवडणूक घेण्यापूर्वी विविध कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नाही, ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते. त्यांचे पालन झाले नाही असा आरोप जयश्री शेळके यांचा आहे. शेळके कडून अॅड. आकाश मून यांनी कामकाज पाहिले.

Previous article१० लाखांच्या वादातून मेव्हण्याच्या खून प्रकरणी दोघां आरोपींना २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी!
Next articleधर्माचार्य हभप निवृत्ती महाराज रायते यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.