आशाताई बच्छाव
साकोलीत भाजपाच्या वतीने १९७५ च्या आणीबाणी विरोधात निषेध
संजीव भांबोरे
भंडारा-भारत देशाच्या इतिहासातील २५ जुन १९७५ हा दिवस आणीबाणी म्हणजे काळा दिवस.ह्या दिवसाला आज २५ जुन २०२५ ला पन्नास वर्ष पूर्ण झाले. ह्या आणीबाणीच्या काळात भारतीय संविधानाला झुगारुन आणीबाणी लावण्यात आली, कित्येक स्वयंसेवकांना तुरुंगात डांबण्यात आले, प्रसार माध्यमावर निर्बंध लावण्यात आली,सामान्य लोकांवर अत्याचार करण्यात आले.देशाला आणीबाणीच्या काळोखात ढकलण्यात आले, ह्या आणीबाणीच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी साकोली शहर मंडळाच्या वतीने जुनी पंचायत समिती साकोली येथे निषेध नोंदविण्यात आला.
ह्या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री व विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांची प्रमुख उपस्थिती लाभली,सर्वप्रथम परिणय फुके यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर आणीबाणीच्या निषेधार्थ घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपा जिल्हा सचिव किशोर पोगडे,भाजपा जिल्हा सचिव रवी परशुरामकर,भाजपा जिल्हा किसान आघाडी महामंत्री भोजराम कापगते,माजी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल हलमारे,माजी शहराध्यक्ष नितीन खेडीकर,साकोली/सेंदुरवाफा शहर मंडळ अध्यक्ष व्यंकटेश येवले,एकोडी मंडळ अध्यक्ष किशोर बोपचे,भाजपा सेंदुरवाफा शहर अध्यक्ष शंकर हातझाडे, भाजपा महिला मोर्चा साकोली शहर/सेंदुरवाफा मंडळ अध्यक्षा प्रीती डोंगरवार,जि. प. सदस्या वनिता डोये, मा.जि.प.सदस्या माहेश्वरी नेवारे,माजी न.प.उपाध्यक्ष जगन उईके,साकोली/सेंदुरवाफा शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष चंद्रशेखर कापगते,माजी नगरसेवक पी.एम.कोटांगले,माजी नगरसेविका मीना लांजेवार,महादेव कापगते, डाकराम कापगते,अरुण बडोले, प्रकाशराणा मेश्राम,आनंद सोनवाणे,रमेश मुंगलमारे,सुभाष रोकडे,अभय कापगते, विलास लांजेवार,विवेक भाजीपाले, भावेश लांजेवार,आशिष काशिवार, राज कापगते, वसंता धकाते,सौ गीता बोरकर,मेघा बडवाईक,शकुंतला गिऱ्हेपुंजे,संगीता मडावी,रंजना मस्के,हिना राऊत तसेच साकोली/सेंदुरवाफा शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.