Home जालना शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनीला भेट

शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनीला भेट

26
0

आशाताई बच्छाव

1001632817.jpg

शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली

जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनीला भेट

 

जालना, दि.23 (जिमाका) :– राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी  सोमवार दि.23 जुन 2025 रोजी सकाळी 7 वाजता जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीला भेट दिली. तसेच निवासी क्रीडा प्रबोधिनीची आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती जाणून घेत समाधान व्यक्त केले.

क्रीडा प्रबोधिनी येथील मुलांनी आतापर्यंत मिळवलेल्या सर्व चषक यांची मंत्री श्री.भुसे यांनी पाहणी केली त्याचबरोबर क्रीडा प्रबोधिनी येथील विद्यार्थ्यांसोबत तसेच पालकांसोबत संवाद साधला.  यावेळी त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. क्रीडा प्रबोधिनीची आजपर्यंतची वाटचाल कशी झाली व त्याच्यासाठी निधी कुठून जमा केला हे सर्व माहिती घेतली.  जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या मुलांसाठी चालविलेली एक आगळीवेगळी क्रीडा प्रबोधिनी आहे हे ऐकल्यानंतर त्यांना आनंद झाला. क्रीडा प्रबोधिनीची वाटचाल निर्विवादपणे चालू ठेवण्यासाठी निधी देण्याचे मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी आश्वासन दिले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार, शिक्षण उपसंचालक श्री. मुकुंद, शिक्षण निरीक्षक सतीश सातव,  शिक्षणाधिकारी बाळू खरात, शिक्षणाधिकारी श्रीमती सानप, भाऊसाहेब घुगे, पंडित भुतेकर, शैलेश घुमारे, उपशिक्षणाधिकारी श्याम देशमुख, गटशिक्षणाधिकारी मनोज कोल्हे, सुभाष भालेराव, विनया वडजे,  शिक्षक संघटनेचे अरुण जाधव, रवींद्र काकडे,  प्रभाकर शिंदे,  सुनील मावकर, प्रमोद खरात,  प्रकाश कुंडलकर,  क्रीडा प्रबोधिनीतील कर्मचारी आदि उपस्थित होते.

 

Previous articleअन्यायकारक वक्फ दुरूस्ती विधेयक विरूध्द शनिवार रोजी आयोजित आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सामिल व्हा ः शेख महेमूद
Next articleआयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here