Home जालना अन्यायकारक वक्फ दुरूस्ती विधेयक विरूध्द शनिवार रोजी आयोजित आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सामिल...

अन्यायकारक वक्फ दुरूस्ती विधेयक विरूध्द शनिवार रोजी आयोजित आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सामिल व्हा ः शेख महेमूद

71

आशाताई बच्छाव

1001632796.jpg

अन्यायकारक वक्फ दुरूस्ती विधेयक विरूध्द शनिवार रोजी आयोजित
आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सामिल व्हा ः शेख महेमूद
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) ः केंद्र सरकारने मुस्लीमाविरूध्द वक्फ दुरूस्ती विधेयक मंजुर करून मुस्लीमांविरूध्द मोठा अन्याय केलेला आहे. या निर्णयाविरूध्द ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि देशातील अन्य मान्यवर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे अन्यायकारक विधेयक केंद्र शासनाने ताबडतोब मागे घ्यावे या मागणीसाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने शनिवार दि. 28 जून 2025 रोजी इदगाह मैदान जुना जालना येथे आंदोलन करण्यात येऊन जाहिर निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जालना जिल्ह्यातील जनतेने हजारोंच्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले आहे.
या जाहिर निषेध सभेमध्ये ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ चे प्रमुख पदाधिकारी मौलाना फरजुल रहिम मुझबी, मौलाना उमरेन महसुज रहेमानी, मौलाना सय्यद सदतुल्ला हुसेनी आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. शनिवार रोजी आयोजित जाहिर निषेध सभा सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजता शांततेत संपन्न होणार आहे.
केंद्र शासनाने या अगोदर देखिल शेतकऱ्यांविरूध्द अन्याय कारक विधेयक आणले होते. परंतू जनतेच्या रेटयामुळे शासनाला नतमस्तक व्हावे लागले. वक्फ बिल दुरूस्ती विधेयका विरोधात संपुर्ण देशामध्ये आंदोलने होत आहेत. शनिवार रोजी आयोजित आंदोलनामध्ये जालना जिल्हयातील जनतेने हजारोंच्या संख्येने सामिल होऊन शासनाला हे विधेयक मागे घेण्यासाठी भाग पाडावे असे आवाहन जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले आहे.

Previous articleजाता पंढरीशी सुख वाटे जीवा कसबे सुकेणे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा वाटेवर चालतांना
Next articleशिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनीला भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.