आशाताई बच्छाव
सातेफळ येथील शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ न भरल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
जाफराबाद तालुक्यातील सातेफळ जिल्हा परिषद शाळेत गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे जर एका आठवड्यात सदर पदे भरली नाहीत तर जिल्हा परिषद जालना या ठिकाणी विद्यार्थी घेऊन ‘शाळा भरो’ आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे
याबाबत सविस्तर असे की, सातेफळ जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग असून दोनशे दहा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शाळेत केवळ पाच च शिक्षक कार्यरत आहेत शाळेतील मुख्याध्यापक यांची तक्रारीने प्रतिनियुक्ती करण्यात आलेली आहे गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या जागेवर अद्याप पर्यंत कायमस्वरूपी मुख्याध्यापक शाळेला देण्यात आलेला नाही तसेच शाळेतील समाजशास्त्र या विषयाचे पद गेल्या पाच वर्षापासून रिक्त आहे. त्यानंतर गणित व विज्ञानाचे शिक्षक येत्या 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहे त्यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात मुख्याध्यापक पदाचा पदभार देण्यात आलेला होता ते सेवानिवृत्त होत असल्याने गणित व विज्ञानासारख्या महत्त्वाच्या विषयाचे पद पर्यायाने रिक्त आहे एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांविना शेवटच्या घटका मोजत असताना सातेफळ ग्रामस्थांचा शाळेवरील विश्वास व येथील कार्यरत उपक्रमशील शिक्षकांमुळे शाळेत सव्वादोनशे विद्यार्थी शिक्षणाचे धडे आजही गिरवत आहे त परंतु शिक्षकांची पदे रिक्त राहिल्यास त्याचा विद्यार्थी संख्येवर व गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे रिक्त शिक्षकांची पदे त्वरित भरावीत अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्राम पंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभू बनकर यांनी गटशिक्षणाधिकारी जाफ्राबाद यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे
याकडे वरिष्ठ अधिकारी कार्यकारी मुख्याधिकारी व जालना शिक्षण विभागाने लक्ष देऊन रिक्त जागा भरावी अशी मागणी अशी मागणी जोर धरत आहे