आशाताई बच्छाव
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ –जिल्ह्यात असलेल्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील शाळेची दुरावस्था.कामरगाव येथे जिल्हा परिषद ची माध्यमिक विद्यालय शाळा असून या शाळेचे बांधकाम 1956 मध्ये करण्यात आले..
आज 68/ 69 वर्षाचा कालावधी या बांधकामाला झाला असून शाळेची इमारत ही बरीच जीर्ण झाली आहे..
सद्यस्थितीत या महाविद्यालयाच्या शाळेत दिवसाला बाराशे च्या वर विद्यार्थी शिक्षण घेतात
व या विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता 45 शिक्षक वृंद या जीर्ण इमारतीच्या छताखाली विद्यार्थ्यांना शिक्षनाचे धडे शिकवतात
शाळेची झालेली जीर्ण इमारत कोसळून काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही
त्यामुळे 2016-17 मध्ये कामरगावच्या रामनगर येथे 20 ते 22 शाळेच्या वर्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे
मागील नऊ वर्षापासून शाळेची इमारत धुळखात असून त्या इमारतीत परिसरातील नागरिक अतिक्रमण करून साहित्य ठेवत आहे
तर सोयाबीनच्या सिझनच्या वेळेस शाळेच्या वर्गखुलीमध्ये मजुराचे मुक्काम ठेवल्या जाते
त्यामुळे नवीन बांधण्यात आलेली इमारत मध्ये सदर शाळेची स्थलांतर करण्याची मागणी कामरगाव येथील गावकरी करत आहे