Home वाशिम बेंबळा शिवारात हरणाच्या पिल्लाला जीवनदान सास कर्तव्य सेवक उत्तमभाऊ नागोलकर यांच्या सतर्कतेमुळे...

बेंबळा शिवारात हरणाच्या पिल्लाला जीवनदान सास कर्तव्य सेवक उत्तमभाऊ नागोलकर यांच्या सतर्कतेमुळे वन्य प्राण्याचे प्राण वाचले

22
0

आशाताई बच्छाव

1001629872.jpg

बेंबळा शिवारात हरणाच्या पिल्लाला जीवनदान

सास कर्तव्य सेवक उत्तमभाऊ नागोलकर यांच्या सतर्कतेमुळे वन्य प्राण्याचे प्राण वाचले

कारंजा/वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ ता. २३ जून:
तालुक्यातील बेंबळा शिवारात आज एक दुर्मिळ व हृदयस्पर्शी घटना घडली. शिवारामध्ये काही मोकाट कुत्र्यांनी एका हरणाच्या पिल्लाला घेरले व जखमी केले. यावेळी त्या मार्गाने जात असलेले सामाजिक कार्यकर्ते व सास कर्तव्य सेवक उत्तमभाऊ नागोलकर यांची नजर या प्रसंगावर पडली.

तेव्हा तात्काळ जागरूकता दाखवत त्यांनी कुत्र्यांना हाकलले व जखमी पिल्लाला सुरक्षित आपल्या ताब्यात घेतले. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून त्या बछड्याला सुरक्षीत आश्रय दिला. ही माहिती सर्वधर्म मित्र मंडळाचे अध्यक्ष श्याम सवाई यांना देण्यात आली.

यानंतर सास कंट्रोल रूम कार्यालयाच्या माध्यमातून वनविभागाचे गोलूभाऊ पुरोहित यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यात आली. वन विभागाच्या टीमने पुढील उपचारासाठी तातडीने मदतीचे नियोजन केले.

सध्या शेतात कामांची लगबग सुरू असतानाही उत्तमभाऊंच्या सतर्कतेमुळे एक वन्य प्राण्याचा जीव वाचवला गेला. शेतकरी, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वन्यजीव संरक्षणात भाग घ्यावा, याचे हे एक आदर्श उदाहरण ठरले आहे.

सर्वधर्म मित्र मंडळाच्या वतीने उत्तमभाऊ नागोलकर यांचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन करण्यात आले आहे.

Previous articleडॉ. गजानन जाधव – वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी क्रांतिकारकाचा सन्मान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here