आशाताई बच्छाव
डॉ. गजानन जाधव – वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी क्रांतिकारकाचा सन्मान
नागपुर /पुणे सुर्यकांत भोर प्रतिनिधी
डॉ. गजानन जाधव हे केस प्रत्यारोपण, सौंदर्यचिकित्सा आणि क्रिटिकल केअर या क्षेत्रांतील एक मान्यवर आरोग्य अग्रदूत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात २६ वर्षांहून अधिक अनुभव असलेले डॉ. जाधव हे केस उपचारासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व विविध संशोधन निर्माण करून केस उपचारासाठी अद्यावत वैज्ञानिक मापदंड रचणारे उत्कृष्टतेचे मूर्तिमंत प्रतीक ठरले आहेत.
La Densitae हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिकचे संस्थापक व संचालक म्हणून डॉ. जाधव यांनी Real-Time Hair Transplant सारख्या क्रांतिकारी पद्धती विकसित करून भारतातील केस प्रत्यारोपण प्रक्रियेच्या दर्जामध्ये नवे मापदंड निर्माण केले. त्यांच्या नेतृत्वाखाली La Densitae हे नाव केस, त्वचा आणि लेझर उपचारांमध्ये विश्वासार्हतेचे प्रतीक बनले असून, आजवर ४ लाखांहून अधिक रुग्णांनी त्यांचा लाभ घेतला आहे.
ट्रायकोलॉजी तसेच त्वचारोगशास्त्र, भूलशास्त्र व क्रिटिकल केअरमध्ये डॉ जाधवांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल सारख्या नामवंत संस्थांतून उच्चतम शिक्षण घेतले आहे. त्यांच्या वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाची दखल घेत त्यांना माननीय केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरीजी च्या हस्ते फेमस अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
एक दूरदृष्टीसंपन्न वैद्यकीय नेता, एक उपचारक्षम डॉक्टर आणि एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. गजानन जाधव यांचा सन्मान वैद्यकीय क्षेत्रासाठी एक प्रेरणादायी पर्व ठरेल यात शंका नाही.