Home नाशिक पिंपळनारे गावात कृषीदूतांचे आगमन

पिंपळनारे गावात कृषीदूतांचे आगमन

64
0

आशाताई बच्छाव

1001591673.jpg

पिंपळनारे गावात कृषीदूतांचे आगमन

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

पिंपळनारे (ता.दिंडोरी) येथे क. का. वाघ उद्यान विद्या महाविद्यालयाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२५-२०२६ अंतर्गत दाखल झाले आहेत.
पिंपळनारे ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये जयेश ढगे, अनुराग बाविस्कर, अजिंक्य अडसरे, ऋषिकेश संगमनेरे यांचा समावेश आहे. तीन महिने कालावधीत हे विद्यार्थी गावातील शेतकऱ्यांसोबत संपर्क साधून आपल्याकडील नवनवीन कल्पनांविषयी शेतकऱ्यांना जागरूक करतील. तसेच शेतकऱ्यांकडील शेतीतील नवीन प्रयोग स्वतः आत्मसात करतील. या प्रात्यक्षिक उपक्रमांमध्ये माती व पाणी परीक्षण, पिकांचे लागवड तंत्रज्ञान, पिकांवर येणारी कीड व रोग यांची माहिती व व्यवस्थापन, शेतीशी निगडीत विविध समस्यांचे निराकरण, बीजप्रक्रिया यांचा समावेश असेल. यावेळी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
के.के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, सचिव के. एस. बंदी, समन्वयक वी एम सेवलीकर तसेच प्राचार्य वी. एस. संधान, प्रा.पी.एस बस्ते, प्रा.पी एस देवरे, प्रा. पी.एम. क्षीरसागर, प्रा. एन. एस.घोगरे, प्रा वी जे. बाजोडे, प्रा.डी.एस.गांगुर्डे यांचे विद्यार्थांना मार्गदर्शन लाभले.

Previous articleपिंपळनारे गावात कृषीदूतांचे आगमन
Next articleमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा कु. गितांजली मडके ला राज्यस्तरीय सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार प्रदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here