Home बुलढाणा दणका! विना नंबर टिप्पर आणि अवैध गौणखनिज वाहतुकीवर कारवाईचा बडगा ! –...

दणका! विना नंबर टिप्पर आणि अवैध गौणखनिज वाहतुकीवर कारवाईचा बडगा ! – गत 5 महिन्यांत 339 विना नंबर टिप्परवर कारवाई, 35 लाखांचा दंड वसूल !

75

आशाताई बच्छाव

1001585451.jpg

दणका! विना नंबर टिप्पर आणि अवैध गौणखनिज वाहतुकीवर कारवाईचा बडगा ! – गत 5 महिन्यांत 339 विना नंबर टिप्परवर कारवाई, 35 लाखांचा दंड वसूल !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, बुलढाणा अंतर्गत कार्यरत वायुवेग पथकाने जानेवारी ते मे 2025 या पाच महिन्यांच्या कालावधीत बेकायदेशीर खनिज वाहतूक करणाऱ्या आणि विना नंबर प्लेट टिप्पर वाहनांवर धडक कारवाई केली आहे. या कालावधीत एकूण 835 वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील 339 विना नंबर टिप्पर वाहनांवर कारवाई करत 35 लाखावरुन जास्त दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.या संदर्भातील माहिती अशी की, जानेवारी महिण्यात 116 वाहनांची तपासणी करुन 40 वाहनावर कारवाईत 4 लक्ष 9 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. फेब्रुवारीमध्ये 189
वाहनांची तपासणी करुन 63 वाहनावर कारवाई
करत 8 लक्ष 71 हजार रुपये दंड, मार्चमध्ये 127
वाहनांची तपासणी करुन 36 वाहनावर कारवाई
करत 5 लक्ष 87 हजार रुपये दंड, एप्रिलमध्ये 98
वाहनांची तपासणी करुन 25 वाहनावर कारवाई
करत 5 लक्ष 68 हजार 500 रुपये दंड, मेमध्ये 305 वाहनांची तपासणी करुन 175 वाहनावर कारवाई करत 10 लक्ष 96 हजार 350 रुपये दंड,
असे एकूण पाच महिण्यात 835 वाहनांची
तपासणी करुन 339 विना नंबर टिप्पर वाहनांवर 35 लक्ष 31 हजार 850 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विना परवाना, विना नंबर प्लेट किंवा बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करू नये. असे प्रकार आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी वाहनधारकांना केले आहे. परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, भविष्यात देखील अशा बेकायदेशीर कृत्यांवर लक्ष ठेवून कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. वाहनधारकांनी नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.