Home जालना स्वतंत्रसेनानी पुंडलिक हरी दानवे औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकरदन येथे शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या...

स्वतंत्रसेनानी पुंडलिक हरी दानवे औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकरदन येथे शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

181

आशाताई बच्छाव

1001584371.jpg

स्वतंत्रसेनानी पुंडलिक हरी दानवे औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकरदन येथे शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूज रिपोर्टर गजेंद्र लोखंडे भोकरदन
स्वतंत्र सेनानी पुंडलिक हरी दानवे औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकरदन येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यास भोकरदन येथील एसबीआय बँकेचे मॅनेजर नचिकेत देशपांडे पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक श्री जगताप साहेब व चिकटे साहेब युवा मराठा चे भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे व आयटीआय प्राध्यापक तसेच उद्योजक संस्थेचे माझी विद्यार्थी अमोल शिरसाट शिक्षिका विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी प्रभारी प्राचार्य के. बी. ठाकुर. एसबीआय बँकेचे नचिकेत देशपांडे युवा मराठाचे गजेंद्र लोखंडे पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक जगताप साहेब चिकटे साहेब प्राध्यापिका स्वाती तळेकर व प्राध्यापक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली
या संस्थेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन केले होते या व्याख्यानाच्या प्रमुख अतिथी स्वाती तळेकर यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच एसबीआय बँकेचे नचिकेत देशपांडे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन साठी पाच विषयावरती मार्गदर्शन करावे असे विषय निवडले कौटुंबिक नैसर्गिक स्वदेशी विदेशी तसेच पर्यावरण या विषयावरती सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मान्यवरांची तुळशी रोप देऊन स्वागत करण्यात आले.

Previous articleपोलीस ठाणे जाफराबाद पोलिसांची अवैध दारूची विक्री विरूद्ध मोठी कारवाई 6 लाख 44 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
Next articleकै. गयाबाई बारकू गायकवाड यांचे निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.