आशाताई बच्छाव
पोलीस ठाणे जाफराबाद पोलिसांची अवैध दारूची विक्री विरूद्ध मोठी कारवाई 6 लाख 44 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यांना आज दिनांक 09/06/2025 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, जाफराबाद ते भोकरदन रोडलगत कोल्हापूर शिवारात आसई फाट्या जवळ एका घरा समोर मारोती स्विप्ट डिझायर गाडी मध्ये अवैध दारूचे बॉक्स ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्याने सदर माहिती ची खात्री करणे कामी व कारवाई करणे कामी पोऊपनि पवार यांचे पथक पाठविले असता अंबादास जाधव रा. कोल्हापूर यांचे आसई जवळील घरा समोर एक मारोती स्विप्ट डिझायर कार क्रमांक MH-05-AX-8126 ही मिळून आली सदर वाहनाची पाहणी करता डिक्की मध्ये देशी दारू भिंगरी संत्रा असे लेबल असलेले 11 खाकी रंगाचे बॉक्स ज्या मध्ये प्रत्येकी 180 मिली च्या 48 सीलबंद बाटल्या असलेले मिळून आले . सदर वाहना बाबत घरमालकास विचारपूस केली असता ते वाहन बालाजी साहेबराव जाधव रा. कोल्हापूर याचे असल्याने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचे घराची कोल्हापूर येथील घराची झडती घरा मध्ये देशी दारू भिंगरी संत्रा च्या प्रत्येकी 180 मिली च्या 48 सीलबंद बाटल्या असलेले 19 खाकी रंगाचे बोक्स मिळून आले. असे एकूणदेशी दारू भिंगरी च्या 48 सीलबंद बाटल्या असलेले 19खाकी रंगाचे बॉक्स मिळून आले.असे एकूण देशी दारू भिंगरी संत्रा च्या 30 खाकी रंगाचे बॉक्स किंमत अंदाजे 1,44,000/- रूपये व एक मारोती स्विप्ट डिझायर कार क्रमांक MH-05-AX-8126 हीची अंदाजे किंमत 5,00,000/- रूपये असा एकूण 6,44,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करुन पुढील कायदेशीर कारवाही करीत आहोत.
सदरची कारवाई मा. अजय कुमार बंसल साहेब सो. पोलीस अधीक्षक जालना मा.श्री.आयुष नोपाणी सो. अप्पर पो. अधिक्षक जालना, मा. कुलकर्णी सो.SDPO भोकरदन यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री प्रताप इंगळे सपोनि. श्रीमतीवैशाली पवार, पोउपनि श्री वसुदेव पवार,सफौ भापकर,पोहे. गजानन गावंडे,पोह अरुण वाघ, पॉकॉ संदिप गवई व होमगार्ड यांनी कारवाई केली आहे.