Home जालना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत मोटार सायकलवर अवैध्य दारूची विक्री करणारा आरोपी...

जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत मोटार सायकलवर अवैध्य दारूची विक्री करणारा आरोपी 92600/- रूपयाच्या मद्देमालासह ताब्यात

118

आशाताई बच्छाव

1001581074.jpg

जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत मोटार सायकलवर अवैध्य दारूची विक्री करणारा आरोपी 92600/- रूपयाच्या मद्देमालासह ताब्यात

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

जालना जिल्ह्यात अवैधरित्या चोरटी दारूची विक्री करणाऱ्या इसमाची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने दि.07/06/2025 रोजी 13.00 वा. पोलीस स्टेशन अंबड हद्दीत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या इसमाची माहिती घेत असताना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, राणीउंचेगाव ते गाढेसावरगाव जवळ नंदिनी हॉटेल समोर एक ईसम त्याची इलेक्ट्रिक स्कुटीवर विनापरवाना बेकायदेशीर रित्या देशी विदेशी दारूची विक्री करण्यासाठी वाहतूक करीत आहे त्या अनुषंगाने नंदिनी हॉटेल समोर जाऊन थांबलो असता त्याठिकाणी एक ईसम ओकीनाव्हा कंपनी ची लाल रंगाची इलेक्ट्रिक स्कुटीवर आला. त्यास थांबवून पंचा समक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव लक्ष्मण सुरेश लांडगे वय 19 वर्षे रा. इंदेवाडी ता. जि. जालना असे सांगितले त्या प्रो.रेडचा उद्देश कळवून त्याच्या स्कुटीची झडती घेतली असता त्याच्याकडे 92600/- रू. किमतीचा देशी व विदेशी दारू व गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कुटी जप्त करण्यात आली.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री.अजय कुमार बंसल साहेब व मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी योगेश उबाळे, सपोनी राजेंद्र वाघ, देविदास भोजने, सागर बावस्कर भगवान खरात सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.

Previous articleश्रीरामपूरचे माजी आमदार भानूदास मुरकुटे यांचा समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
Next articleहौशी फोटोग्राफर्ससाठी कॉफी टेबल बुक-नांदेड छायाचित्र स्पर्धा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.