आशाताई बच्छाव
पर्यावरण दिनानिमित्त आयोजित,एक पेड मां के नाम,वरूडी येथे वृक्षारोपण
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
बदनापूर तालुक्यातील वरूडी येथे ०६/०५/२०२५ रोजी शिवराज्याभषेक दिन तथा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ” एक पेड मां के नाम” या उपक्रमासाठी मा. श्री. शिरीष बनसोडे सर ( मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना), मा. तूबाकले सर ( उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना), मा. बारगीरे सर ( प्रकल्प संचालक जल जीवन मिशन जिल्हा परिषद जालना) , श्रीमती ज्योती राठोड मॅडम (गटविकास अधिकारी प.स. बदनापूर ) यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत वरुडी येथे घनदाट वृक्षलागवड अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले तसेच कंपोस्ट खड्डा भरू आपले गाव स्वच्छ ठेवू उपक्रमांतर्गत कंपोस्ट खड्डा पाहणी करण्यात आली, स्मशानभूमी परिसर व मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी मा. बनसोडे सर ,बारगीरे सर, आणि राठोड मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमप्रसंगी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.