आशाताई बच्छाव
05 जून रोजी चे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचे आव्हान
महादेव घोलप सोलापूर
मा. श्री अतुल कुलकर्णी सो पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांची संकल्पनेतून हरित वारी हा उपक्रम सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. सदरचा उपक्रम जिल्ह्यामध्ये राबविण्याकरिता उद्या दिनांक 05 जून रोजी चे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याकरिता व पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्याकरिता टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे वतीने टेंभुर्णी शहरामध्ये वृक्षदिंडी चे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व सामाजिक संस्था, वक्ष मित्र टेंभुर्णी शहर व आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांनी उद्या सकाळी ठीक 10/00 वाजता टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे वृक्षदिंडीकरिता हजर राहण्याबाबत आवाहन करीत आहोत.असे आव्हान
श्री नारायण पवार पोलीस निरीक्षक
टेंभुर्णी पोलीस ठाणे यांच्या वतीने करण्यात येत आहे.