आशाताई बच्छाव
भिला आहेर तालुका प्रतिनिधी
देवळा प्रतिनिधी:- देवळा तालुक्यातील खारीफाटा येथील खाजगी बाजार समितीत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे कोट्यवधी पैसे थकविल्याने समस्त शेतकऱ्यांची मार्केट आवारात घोषणाबाजी.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील खारीफाटा येथे गेल्या काही वर्षांपासून व्यापाऱ्यांनी खासगी रामेश्वर कृषी मार्केट चालू केले असून येथे कांदा व भुसार मालाची खरेदी विक्री सुरू आहे परिसरातून मोठ्या प्रमाणावर शेतमालाची याठिकाणी आवक होत असते मात्र गेल्या काही दिवसांपासून एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीचे कोट्यवधी रुपये थकविल्याने काल (दि.३ ) रोजी संबंधित बाजार समितीत पणन मंडळाचे काही अधिकारी येणार असल्याचे शेतकऱ्यांना समजताच ज्या शेतकऱ्यांची थकबाकी आहे असे शेतकरी बाजार समितीच्या आवारात जमा झाले व समस्त शेतकऱ्यांचा उद्रेक होत मार्केटच्या आवारात खरेदीसाठी आलेल्या संबंधित व्यापाऱ्याची व शेतकऱ्यांची यावेळी बाचाबाची देखील झाली यावेळी पणन विभागाकडून आलेल्या पथकाने शेतकऱ्यांना रीतसर देवळा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात लेखी स्वरूपात तक्रार देण्याच्या सूचना यावेळी दिल्या आमचे घामाचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे, रामेश्वर कृषी मार्केटचा निषेध असो अशा पद्धतीने घोषणा देखील देत परिसर दणाणून सोडला काही शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात विक्री केलेल्या उन्हाळ कांद्याचे पैसे अडकल्याने सदर व्यापारी दोन दिवसात तुमचे पैसे देतो, चार दिवसांत देतो अशा पध्दतीने तारिख पे तारीख देत गेले मात्र सहा महिने उलटूनही जर शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळत नसल्याने त्यांचा अखेर संयम सुटला व काल अशा पद्धतीने घोषणाबाजी केली जर दोन दिवसांत आमचे पैसे मिळाले नाहीत तर आम्ही मार्केट बेमुदत बंद पाडू असा देखील इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.