Home जालना घरकुलाच्या मागणीसाठी  दिव्यांगांचा    महानगरपालिकेवर धडक मोर्चा  

घरकुलाच्या मागणीसाठी  दिव्यांगांचा    महानगरपालिकेवर धडक मोर्चा  

29
0

आशाताई बच्छाव

1001561062.jpg

घरकुलाच्या मागणीसाठी  दिव्यांगांचा
महानगरपालिकेवर धडक मोर्चा
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ- घरकुल देण्यात यावे तसेच कर निर्धारक रामेश्वर घोळवे यांची बदली रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी
( दि. 2) जालना महानगर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे, सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपंग  सेलचे जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे ,लक्ष्मी भुतडा,संगीता झाडीवाले, सतिश वाघ , तसेच मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा महानगर पालिकेवर धडकला.
यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने महानगर पालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात महानगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांना घरकुल द्यावे, जालना महानगरपालिकेचे दिव्यांग विभागाचे अधीक्षक रामेश्वर घोळवे यांची बदली रद्द करण्यात यावी,मधुबन  कॉलनी किंवा मस्तगड येथे दिव्यांगासाठी पुनर्वसन केंद्रासाठी जागा उपलब्ध करावी,  गांधी चमन ते रेल्वे स्थानक आठवडी बाजारासाठी दिव्यांगांना राखीव जागा द्यावी, मागील वर्षी 180 दिव्यांगाचे पाच टक्के निधी थकलेला निधी  दिव्यांगाच्या खात्यात जमा करावा आदी मागण्यांचा समावेश आहे.
या मोर्चात सविता बोराडे ,पुजा मेड,  अशोक मंत्री, शोभा देशमुख ,राजेश कावेटी,  शेख साबेर, संतोष गवटे ,शेख  आसलम, शेख मतीन, शेख शफीक, राजेद्र गाडेकर, तुळशीराम घडे, विठ्ठल चव्हाण, एकबाल  पठाण आदींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here