आशाताई बच्छाव
भंडारा जिल्हा गुणगौरव सोहळा व जनरल सभा शेंदूरवाफा ( साकोली)येथे मोठ्या उत्साहात संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा-अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज, दक्षिण पीठ,नानिजधाम, जिल्हा -रत्नागिरी( महाराष्ट्र), *यजमान भंडारा जिल्ह्याच्या* वतीने दिनांक १ जून २०२५ रविवारला सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळात *भंडारा जिल्हा गुणगौरव सोहळा व जनरल सभा*, स्थळ -गजानन महाराज देवस्थान, सेऺदूरवाफा, साकोली,तालुका- साकोली ,जिल्हा- भंडारा या ठिकाणी *स्वरूप संप्रदाय भक्त सेवा मंडळ जिल्हा भंडारा* यांच्या वतीने पार मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या गुणगौरव सोहळयात संस्थांमार्फत आर्थिक वर्ष २०२४ -२०२५ या आर्थिक वर्षात *श्री संप्रदायातील* पदाधिकारी, युवा युवती, संग्राम सैनिक, महीला बघीनी ,भक्तगण व कार्यकर्त्यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिली त्यांचा शिल्ड,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व गुलदस्ता देऊन गुणगौरव करण्यात आला.
या सोहळ्यात जगदगुरूश्री नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान च्या वतीने संपूर्ण भारतात राष्ट्रीय महामार्गावर 53 रुग्णवाहिका अपघातग्रस्तांच्या मोफत सेवेकरिता अविरत कार्यरत आहेत. त्यापैकी भंडारा शहरालगत राष्ट्रीय महामार्ग असलेली रुग्णवाहिकेतून
आतापर्यंत तीनशेच्या वर लोकांचे प्राण या रुग्णवाहिकेमुळे वाचलेले आहेत. ही अमूल्य सेवा या देणारे , रुग्णवाहिकेचे चालक प्रमोद मोहतुरे यांचे सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पूर्व विदर्भ पिठाचे प्रमुख राजेंद्र भोयर, पूर्व विदर्भ पिठाचे व्यवस्थापक प्रवीण परब लाभले होते. तसेच श्री.कथेचे प्रमुख दिलीप गायकवाड, पुर्व विदर्भ पीठ निरीक्षक वैशाली चतुर, पुर्व विदर्भ पीठ कमेटी सदस्या पुष्पाताई दळवी ,पिठ संजीवनी प्रमुख खोपडे , पीठ रुग्णवाहिका प्रमुख जगदीश फालक, गोंदिया निरीक्षक नवरंग मेश्राम, भंडारा जिल्हा निरीक्षक संतोष भुरे, भंडारा जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष वर्षाताई फंदे , बालाघाट निरीक्षक दीपक साठवणे, नाणिजधाम ऑडिटर मनोहर फंदे, भंडारा जिल्हा आध्यात्मिक प्रमुख मनोज तऱ्हेकर ,भंडारा जिल्ह्याचे भंडारा जिल्हा कर्नल श्रीधर वैद्य ,भंडारा जिल्हा ब्लड इन नीड प्रमुख प्रशांत कुंजेकर, भंडारा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गोपाल माकडे , साकोली तालुका अध्यक्ष के.डी लांजेवार, भंडारा जिल्हा धर्मक्षेत्र प्रमुख नेहाताई पोटभरे, भंडारा जिल्हा तंत्रज्ञान प्रमुख निकिता ठवकर, भंडारा जिल्हा संजीवनी प्रमुख प्रियंका भुरे, भंडारा जिल्हा सामाजिक प्रमुख अशोक मोटघरे तसेच भंडारा जिल्ह्यातील जिल्हा समितीचे सर्व सदस्य,भंडारा जिल्ह्यातील भंडारा, साकोली ,लाखनी, मोहाडी ,लाखांदूर ,पवनी, तुमसर तालुक्यातील तालुका अध्यक्ष व महिला अध्यक्ष, तालुका कार्यवाहक, तालुका पदाधिकारी,सेवाकेंद्राचे पदाधिकारी ,संग्राम सैनिक ,धाम यात्री ,युवा ,युवती महिला व पुरुष ,भक्तगण, आजी-माजी पदाधिकारी या कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भंडारा जिल्हा सचिव होमराज वनवे, प्रास्ताविक भंडारा जिल्हाध्यक्ष नितेशजी वंजारी व कार्यक्रमाची सांगता भंडारा जिल्हा युवा अध्यक्ष आशिष बालपांडे यांनी पार पाडले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला . महाप्रसाद व माऊलीची आरती करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .