आशाताई बच्छाव
पारध येथे जखमी मोराचे युवकांनी वाचवले प्राण
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
भोकरदन तालुक्यातील पारध येथील शेतकऱ्यांच्या विहिरीत मोर पडल्याची घटना 31 मे रोजी निदर्शनात आल्याने त्यांना विहिरीत पडलेल्या या जखमी मोराला सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले यावेळी पवन लोखंडे, संतोष सोनवणे, कृष्णा लोखंडे ,अण्णा पाटील लकस यांनी विहिरीतील मोराला खाटेच्या सहाय्याने बाहेर काढले तर विहिरी जवळ उभ्या असलेल्या मुलाने दोरीच्या साह्याने मोराला अलगदवर उचलून बाहेर घेतले आणि पाणी पाजून पुन्हा त्याला जंगलात सोडून देण्यात आले.यासर्वांचे परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.