आशाताई बच्छाव
पिंपळगाव बसवंत येथील शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू
सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी प्रवेश
दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे
सामाजिक न्याय विभागाच्या अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा पिंपळगांव ( ब) ता.निफाड जि.नाशिक येथे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा पिंपळगांव (ब) ता.निफाड जि. नाशिक येथील शाळेत वर्ष २०२५- २६ करिता इयत्ता ६ वी ते १० वी सेमी इंग्लिश वर्गाकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचे आव्हान मुख्याध्यापक श्री.सागर विशे सर यांनी केले आहे.तसेच इयत्ता ६ वी ते १० वी वर्गातील ठरलेल्या प्रवर्ग निहाय रिक्त जागांवरच प्रवेश होतील याची पालकांनी नोंद घ्यावी व प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांचे आरक्षण टक्केवारी अनुसूचित जाती ८०% अनुसूचित जमाती १०% विजभज ५% एसबीसी आणि दिव्यांग करिता ५% विद्यार्थ्यांकरिता आरक्षण असून भव्य सुसज्ज इमारत, निसर्गरम्य परिसर,तज्ञ शिक्षकवृंद, सुसज्ज ग्रंथालय,प्रशस्त पटांगण आणि खेळ साहित्य मोफत शैक्षणिक साहित्य आणि गणवेश विद्यार्थ्यांकरिता नाश्ता व भोजन व्यवस्था, संगणक प्रयोगशाळा, अद्यावत डिजीटल रुम द्वारे उत्कृष्ट अध्यापनाची व्यवस्था असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.अधिक माहिती साठी प्रवेशाकरिता मुख्याध्यापक श्री.सागर विशे सर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क – श्री.सागर विशे.मो.नं. 7021413970, श्री.नरेंद्र मेधने (गृहपाल) मो.नं 8237555916, श्री.शंकर पवार मो.नं.9890235800 इच्छुकांनी या नंबर वर संपर्क साधावा.