आशाताई बच्छाव
माहोरा ग्रामसंसद कार्यालय येथे अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
माहोरा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर ञिशताब्दी जयंतीनिमित्त आज ग्रामसंसद कार्यालय माहोरा येथे पुष्प अर्पण करून व विनम्र अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली, यावेळी सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सविता रामेश्वर दौंड, मालिका नंदकिशोर बोर्डे यांचा ग्रामपंचायत वतीने अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, यावेळी जेष्ठ नेते भगवानराव लहाने, भाऊसाहेब पाटील जाधव, सरपंच गजानन लहाने, उपसरपंच बाबासाहेब बोरसे यांच्यासह ग्रामसंसद चे सर्व सदस्य, पत्रकार बंधू, गावकरी, सामाजिक कार्यकर्ते आशाताई, अंगणवाडी ताई उपस्थितीत होत्या. तसेच गावातली नागरीक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.