Home अमरावती अमरावती शहरात पुढील सहा दिवस राहणार वीस पुरवठा बंद. वीज यंत्रणा दुरुस्तीला...

अमरावती शहरात पुढील सहा दिवस राहणार वीस पुरवठा बंद. वीज यंत्रणा दुरुस्तीला झाली आजपासून सुरुवात.

93
0

आशाताई बच्छाव

1001545663.jpg

अमरावती शहरात पुढील सहा दिवस राहणार वीस पुरवठा बंद. वीज यंत्रणा दुरुस्तीला झाली आजपासून सुरुवात. दैनिक युवा मराठा. पी.एन. देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. वादळामुळे प्रवाहित झालेले वीज यंत्रणा तसेच पावसाळा लक्षात घेता देखभाल, दुरुस्तीच्या कामे २९मेते३ जून पर्यंत केली जाणार आहे. फिडर न्याय ती कामे करण्यात येणार असल्याने सकाळी ७ते दुपारी १ वाजेपर्यंत संबंधित भागातील वीस पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे वीस ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आव्हान महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय सराटे यांनी केली आहे. गुरुवारी ११केव्ही श्रीकृष्ण पेठ फिडर वरील देखभाल दुरुस्ती करण्यात येणार असल्याने या फिडरवरून वीस पुरवठा होणाऱ्या श्रीकृष्ण पेठ, ईरवीन चौक, येथील काही भाग शिवाजी सायन्स कॉलेज, तहसील, देवराव गॅरेज या भागाच्या वीस पुरवठा बंद राहणार आहे.३०मेरोजी१केव्ही चौधरी चौक फीड वरील वालकट कंपाऊंड, कॉटन मार्केट रोड, वालकट कंपाउंड, एपीएमसी, बच्छारास प्लॉट, चौधरी चौक, हिंदी चौक, राम लक्ष्मण संकुलन या भागाची दुरुस्ती होणार आहे ३१मे रोजी११केव्हीएच.टी. फिडर वरील डफरीन, सुपर स्पेशलिस्ट, शासकीय तंत्रनिकेतन, जिल्हा क्रीडालय, संस्कृती भवन परिसरातील वीज बंद राहील.१जुनरोजी११केव्ही रेल्वे स्टेशन फिदर वरील कामे करण्यात येणार असल्याने जिल्हा रुग्णालय, खापर्डे बगीचा, समाधान नगर, होली क्रॉस, रेल्वे स्टेशन रोड, बस स्थानक, काझी कंपाउंड, बस स्टँड रोड या भागाचा वीस पुरवठा बंद राहील.२जुनला ११केव्ही एल.आयसी. फिडर दुरुस्तीमुळे अशोक नगर एलआयसी ऑफिस गौतम नगर रामपुरी कॅम्प भीमनगर सिद्धार्थ नगर सिविल लाईन या भागाचा विष पुरवठा बंद राहणार आहे अशी माहिती महावितरणने आमच्या प्रतिनिधीला दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here