आशाताई बच्छाव
कर्जमुक्ती साठी शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर
तहसीलदार मार्फत शेतकऱ्यांचे अर्ज मुख्यमंत्री यांच्याकडे सादर
संजीव भांबोरे
भंडारा –जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कामासाठी बँकेकडून कर्ज घेतले पण दुष्काळ व नापिकी तसेच उत्पादनात घट या कारणामुळे कर्जाची किस्त भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्यांना पडला आहे. हातात पैसे नसल्यामुळे कर्ज कसा भरावा या विवंचनेत शेतकरी असून साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे असे मागणीचे निवेदन किसान ब्रिगेड संघटनेतर्फे दुसऱ्या टप्प्यातील अर्ज सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांच्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले .
भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज माफी साठी शेतकरी नेते व किसान ब्रिगेडचे च्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती साठी उपक्रम राबविण्यात आले आहे शेतकऱ्यांनी रब्बी व खरीप हंगामातील कृषी कार्य करण्यासाठी तसेच रासायनिक खत खरेदी करण्याकरिता विविध बँकेकडून कर्ज घेतले पण पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन झाले नाही उत्पादनात कमालीची घट यावर्षी आली आहे अशाच निसर्गाच्या लहरीपणामुळे सुद्धा शेतातील पिकांचे नुकसान झाले कुठे दुष्काळ तर कोठे अतिवृष्टीमुळे सुद्धा शेतातील पिकाचे नुकसान झाले जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन चांगला होईल या आशेवर बँकेकडून कर्ज घेतले पण दुष्काळामुळे झालेली नापिकी तसेच वातावरणाच्या लहरीपणामुळे अतिवृष्टी काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी अहवाल दिल झाला आहे
अशाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची किस्त भरायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एकीकडे दुष्काळ व नापिकेमुळे उत्पादनात झालेली घट तसेच दुसरीकडे बँकेचे कर्ज कसे फेडायचे अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. काय शेतकऱ्यांनी तर कृषी कार्यासाठी बँकेतून कर्ज घेतले आहे. पण सावकाराकडून सुद्धा कर्ज घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाचे डोंगर वाढत चाललेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकऱ्यांच्या कर्ज माफ करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेले आहे. सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी
मनुदेव वघारे, सुखदेव मोटघरे, देवेंद्र मोटघरे ,गोवर्धन मेश्राम, वासुदेव मोटघरे ,छोटेलाल गेडाम, कैलास देशपांडे, दुर्योधन तवाडे, हंसराज कोरे अश्या शेतकऱ्यांचे निवेदनावर सही आहेत तर 17 शेतकऱ्यांचे अर्ज तहसीलमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.






