आशाताई बच्छाव
मंगरूळपीर खरेदी विक्री च्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या शेलुबाजार येथील नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्याचे अतोनात हाल वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ
नाफेडच्या माध्यमातून तूर विक्रीचे व खरेदीचे काम चालू असून शेलुबाजार येथे आठ ते दहा शेतकरी तूर विक्री करिता घेऊन आलेले आहेत परंतु त्यांचा शेतमाल आजच्या तारखे मध्ये मोजून घेतलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल घेऊन येथे मुक्कामी राहावे लागत आहे. शेतमाल भिजून याकरिता संबंधित एजन्सीने कुठले उपाययोजना केलेली नाही तसेच शेतकऱ्याला रात्रीचे मुक्काम करण्याकरिता कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्याची अतोनात हाल चालू आहे. परंतु मुसळधार आलेल्या पावसामुळे या शेतकऱ्यांचे झोपण्याचे व राहण्याची मोठी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसेच शेतमाल पावसामुळे खराब होऊ नये यासाठी शेतकरी तारेवरची कसरत करत आहे. संबंधित विभागाने व खरेदी विक्रीने या शेतकऱ्यांची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे…