आशाताई बच्छाव
उसाच्या दरात यंदाही ‘समृद्धी’च वरचढ ! : शेतकऱ्यांना २९७० रूपये एफआरपी देण्याची कारखान्याची घोषणा
200 रुपयांचा दुसरा हप्ता लवकरच खात्यात होणार जमा : चेअरमन सतीश घाटगे
——————–
घनसावंगी/जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ: शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देणारा साखर कारखाना म्हणून मराठवाड्यात ओळख निर्माण केलेल्या समृद्धी साखर कारखान्याने यंदाही उच्चांकी भावाची परंपरा कायम ठेवली आहे. गाळप हंगाम २०२४ -२५ मध्ये गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला २९७० रुपये प्रती मे. टन प्रमाणे दर देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी सोमवारी (दि. २६) केली. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठी मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
अंबड -घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला योग्य मोबदला देण्यात समृद्धी साखर कारखाना मराठवाड्यात आघाडीवर राहत आला आहे. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये समृद्धी कारखान्याने गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी पेक्षा ११० रुपये अधिक भाव देत २ हजार ८०० रुपये प्रतीटन प्रमाणे अंतिम बिल दिले. तर गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये देखील समृद्धी साखर कारखान्यात गाळप झालेल्या उसाला उच्चांकी दिला आहे.
आता गाळप गाळप हंगाम २०२४ -२५ मध्ये गाळप झालेल्या उसाला २९७० रुपये प्रती मे. टन भाव देण्याची घोषणा केली आहे. पहिला हप्ता २५०० रुपये प्रती मे. टन प्रमाणे दिल्यानंतर लगेच दुसरा हप्ता 200 रुपये प्रती मे. टन प्रमाणे देण्यात येणारी असल्याची माहिती समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिली आहे. दुसऱ्या हप्त्याची रक्कम वाटप झाल्यांनतर तिसरा हप्ता देखील लवकर शेतकऱ्यांना देण्यात असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले आहे. गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये थेट २९७० रुपये प्रति मे. टन दराने एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.






