आशाताई बच्छाव
सन्मान द्या आणि सन्मान घ्या
या सामाजिक उपक्रमांतर्गत
पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त , राज्यस्तरीय ऑफलाइन स्पर्धा परीक्षेत, गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, व विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे 9 जूनला आयोजन
भंडारा– प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे संपादक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 9 जून 2025 ला दुपारी 3 वाजता राज्यस्तरीय घेण्यात आलेल्या ऑफलाइन सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम ,द्वितीय ,तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर छत्रपती संभाजी नगर हे करणार आहेत .तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ .खुशाल बोपचे हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून शिवशंकर मुंगाटे सरपंच अड्याळ तथा माजी उपसभापती पंचायत समिती पवनी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील अड्याळ, संविधान संघर्ष समिती भंडारा जिल्हा चे अध्यक्ष रोशन जांभुळकर, जनता टाईम/ जनता टीव्हीचे मुख्य संपादक निखिलेश कांबळे नागपूर,शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथील संचालक जीवन बोधी बौद्ध नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार .सदर कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रातील 50 कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रम त्याचप्रमाणे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत समर्पण ब्लड बँक भंडारा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन व नेत्रसेवा हॉस्पिटल भंडारा यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन अर्पित मेश्राम व मित्र परिवारातर्फे करण्यात आलेले आहे. करिता कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन प्राध्यापक राजेश नंदपुरे, प्रबोधनकार भावेश कोटांगले, सामाजिक कार्यकर्ते पंकज वानखेडे, अर्पित मेश्राम ,आशिष चेडगे ,डॉ. कुलदीप गंधे, आशिष मेश्राम, प्रमोद वासनिक , गुलाब घोडसे ,विनय ढोके ,संजय वंजारी, विलास बांडेबुचे ,प्रशांत कुमार बडोले यांनी केलेले आहे.






