आशाताई बच्छाव
माहोरा येथील सचिन चौधरी यांची आंतरराष्ट्रीय युवा संघटनेच्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ युथ अमेरिका या संस्थेच्या सहाय्यक उपाध्यक्षपदी नियुक्ती
जाफराबाद प्रतिनिधी मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिका या संघटनेच्या सहाय्यक उपाध्यक्षपदी जाफराबाद तालुक्यातील माहोरा गावचे रहिवासी सचिन चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जगातील सर्व देशांमधून सहाय्यक उपाध्यक्ष हे एकच पद आंतरराष्ट्रीय युवा संघटनेच्या माध्यमातून निश्चित केलेले आहे.तसेच सचिन चौधरी यांचे 18 सप्टेंबर 2024 रोजी न्यूयॉर्क येथे युनोच्या मुख्यालयात भविष्यातील युवा निर्माते या विषयावर भाषण झाले होते. त्यांनी विवीध सामाजिक संस्था बरोबर काम केले आहे. युनेस्को सचिन चौधरी सदस्य म्हणून सुध्दा कार्यरत आहेत.
सचिन सोमनाथ चौधरी हे मूळचे जालना जिल्हा जाफराबाद तालुक्यातील माहोरा या गावातील रहिवासी आहे त्यांची प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी अजीम प्रेमजी विद्यालय बंगलोर येथून पदव्युतर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मध्यप्रदेश ,बिहार, पुणे आणि पालघर येथे आदिवासी आणि ग्रामीण समुदायाची सेवा केलेली आहे.सचिन चौधरी हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील ट्रस्ट मध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.
सचिन चौधरी यांच्या नियुक्ती बद्दल जालना जिल्ह्यातून तसेच जाफराबाद तालुक्यातून आणि माहोरा येथील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व स्थरामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






