आशाताई बच्छाव
वारजे हादरले! शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्या वाहनावर गोळीबार
वारजे पुणे विलास पवार: पुण्यात दररोज नव्याने गुन्हेगारीच्या घटना घडत असताना वारजेत शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असलेले निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर अज्ञातांकडुन थेट गोळीबार करण्यात आल्याची घटना सोमवार दि. 19 मे रोजी सायंकाळी पावणे बाराच्या सुमारास घारे यांच्या गणपती माथा येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर घडली आहे.
याप्रकरणी निलेश घारे यांनी वारजे माळवाडी पोलीसात तक्रार दाखल केली आली असुन संशयित आरोपीचा पोलीस कसुन शोध घेत आहेत. हा गोळीबाराचा थरार देखील काही नागरीकांनी पाहिला असून या घटनेमुळे वारजे माळवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
सोमवार दि. 19 मे रोजी दुपारच्या वेळी निलेश घारे यांना वारजे माळवाडी भागातील एका सराईताचा नुकताच धमकीचा फोन येऊन गेला होता. धमकीच्या फोन बाबत घारे यांनी गोळीबाराची घटना घडण्यापूर्वीच सायंकाळी दहाच्या सुमारास वारजे माळवाडी पोलीसांना माहीती देखील दिली होती.त्यानंतर घारे हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत गणपती माथा येथील जनसंपर्क कार्यालयात थांबले होते. तेव्हा अचानक गोळी झाडल्याचा आवाज आला आणि सर्वत्र धावपळ उडाली जनसंपर्क कार्यालयाबाहेर पार्किंग केलेल्या घारे यांच्या काळ्या रंगाच्या क्रियेटा या वाहनाच्या काचावर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात दोन जणांकडून गोळीबार करून आरोपी पसार झाले होते. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.