आशाताई बच्छाव
धक्कादायक ! धावत्या रेल्वेसमोर उडी! – मोबाईल बाजूला ठेवून, युवकाने जीवनयात्रा संपवली !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-शेगाव रेल्वे स्थानकाच्या हद्दीत नागझरी-शेगाव दरम्यान एका युवकाने धावत्या रेल्वेखाली उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली. मृत युवकाचे नाव पवन बाळकृष्ण फाळके (२८, रा. टाकळी हाट, ता. शेगाव, जि. बुलढाणा) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, २२ मे रोजी सकाळच्या सुमारास ट्रेन क्रमांक १२८१० चे लोको पायलट ए.एस. बक्षी यांनी माहिती दिली. त्यामध्ये नागझरी-5 शेगाव अप लाइनवर ) एक व्यक्ती गाडीसमोर आल्याने अपघात झाला आहे. माहिती वरून आरपीएफचे एएसआय प्रवीण भरने, हे. कॉ. रंजन तेलंग आणि जीआरपीचे हे. कॉ. रामकृष्ण खंडागळे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तिथे रेल्वेचे कर्मचारी पीडब्ल्यूआय राजेश मीना आणि ट्रॅकमन शशी रंजन हे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, मृतकाने त्यांच्याच समोर मोबाइल बाजूला ठेवत ट्रेनच्या समोर धावत जाऊन रेल्वे ट्रॅकवर झोपून आत्महत्या केली. मृताच्या खिशातून मोबाइल, आधार कार्ड (पवन फाळके नावाचे) व दुचाकीची चावी
मिळाली. मोबाइलद्वारे मृतकाच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी जीआरपी शेगावकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, मृतदेह शेगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.






