आशाताई बच्छाव
असोला बुद्रुक येथे घरकुलांचा सर्वे करीत असताना ग्रामसेवकाला मारहाण गुन्हा दाखल….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- चिखली तालुक्यातील असोला येथे घरकुल योजनेअंतर्गत घरांचा सर्वे करण्यासाठी ग्रामसेवक संतोष सदाशिव सवडतकर (वय वर्ष 48 ग्रामपंचायत अधिकारी असोला बुद्रुक) हे गावात मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांचा सर्वे करीत असतानाच गावातील जाफर खा शेर खा राहणार असोला बुद्रुक यांनी मारहाण केल्याचा गुन्हा अंढेरा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला आहे सविस्तर वृत्त असे की चिखली तालुक्यातील असोला येथे ग्रामसेवक सवडतकर यांनी गावातच पंतप्रधान योजनेअंतर्गत घरकुलांचा सर्वे करीत होते गावातील जाफर खा शेर का राहणार असोला यांनी मारहाण केल्याबाबत अढेरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये मी ग्रामपंचायत अधिकारी म्हणुन जून 2015 या वर्षापासुन असोला बु येथे नेमणुकीस आहे. माझेकडे प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल योजनेचे सर्वेक्षण चे काम पाहतो. गेल्या 15 दिवसापासुन असोला बु गावातील सिस्टीमने अपात्र केलेल्या घरकुल लाभार्थ्यांचे घरकुल पात्र करण्यासाठी सर्वेक्षण चे काम सुरु आहे. दिनांक 22/05/2025 रोजी सकाळी 08/30 वा. पासुन मी असोला बु गावातील प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल चे सर्वेक्षण करीत होतो मी सर्वेक्षण करित असताना दुपारी 02/00 ते 2/30 वा.
दरम्यान अलताफ खा उस्मान खा रा. असोला बु यांचे घराचे घरकुलाचे सर्वेक्षण करीत असतांना तेथे जाफर खा शेर खा रा.
असोला बु हा तेथे आला व मला म्हणाला की, तु इकडे येवुन सर्वे का करतो तु माझे अतिक्रमण काढले आहे तु जास्त हुशार झाला आहे असे म्हणुन त्यांने माझ्या गळ्यातील रुमाल धरुन मला चापटाने मारहाण केली व म्हणाला की, लगड्या तु पुन्हा इकडे आलास तर तुला जिवाने मारुन टाकील अशी धमकी दिली. त्यावेळी तेथे खालीक इल्यास पटेल हे हजर होते त्यानी आमचे भांडण सोडविले. असोला येथील जाफर खा शेर खा यांच्याविरुद्ध अढेरा पोलीस स्टेशनमध्ये कलम
132,115(2)351(2)
अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम, 2016 92 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे…






