आशाताई बच्छाव
पावसाळा व पूर परिस्थितीमुळे रेशन लाभार्थ्यांना जून ,जुलै ,ऑगस्ट 2025 महिन्याचे रेशन एकत्रित मिळणार
संजीव भांबोरे
भंडारा –आगामी येणारा पावसाळा लक्षात घेता परिणामी पूरजन्य परिस्थिती, प्रतिकूल हवामान कार्यक्रम लॉजिस्टिक्स, मालाची साठवणूक करिता येणाऱ्या अडचणी, लक्षात घेता राज्यातील सर्व सरकारी स्वस्त धान्य दुकानात अन्नधान्याची आगाऊ उचल करण्याच्या सूचना व मंजुरी केंद्राकडून प्राप्त झाल्याने राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांनी आगस्ट 2025 पर्यंत निश्चित केलेल्या रेशनच्या अन्नधान्याची उचल 30 मे पर्यंत करण्याचे निर्देश जारी करण्यात आलेले आहेत .राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने काढलेल्या 9 मे रोजीचे आदेशात नमूद केले आहे की, पावसाळा तसेच पूर परिस्थिती, प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ऑगस्ट 2025 पर्यंत एन. एफ. एस .ए अंतर्गत वाटप केलेल्या अन्नधान्याचे आगाऊ विचार करण्यात केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे .सदर अन्नधान्याची उच्चल व वाटप राज्यांनी 30 मे पर्यंत करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यानुसार एन. एफ .एस. ए अंतर्गत ऑगस्ट 2025 पर्यंतची अन्नधान्याची वाटपाची कार्यवाही 30 मे पर्यंत करण्याचे
आदेशात निश्चित केले असल्याची माहिती आहे .याबाबत शासन आदेश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय चे कक्ष अधिकारी महेश कानडे यांनी जाहीर केला असल्याची माहिती आहे.
प्रतिक्रिया
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत भंडारा तालुक्यातील एकूण 174 दुकानात अंतोदय कार्ड योजनेचे 11,7,67 शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंबाचे एकूण लाभार्थ 41575 यांना जून, जुलै ,ऑगस्ट असे एकूण तीन महिन्याचे धान्य त्यांना नेमून दिलेल्या स्वस्त धान्य दुकानातून माहे जून 2025 पासून तिन्ही महिन्याचे धान्य एकत्रित वाटप करण्यात येणार आहे.
पी आर कापडे निरीक्षण अधिकारी पुरवठा विभाग तहसील कार्यालय भंडारा