आशाताई बच्छाव
एकादशी निमित्ताने दिंडीमध्ये वीणा वादन करताना श्री नारायण जी मोरे व शशिकलाबाई मोरे
युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे भोकरदन
भोकरदन शहरांमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून प्रत्येक एकादशीला महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून तुळजाभवानी नगर मध्ये नगर प्रदक्षिणा करून तुळजाभवानी माता मंदिरामध्ये दिंडीचे आरती होऊन समापन होते सुरुवातीला एक दोन महिला व एक दोन पुरुषाच्या सहकारातून एकादशीला सुरुवात झाली होती आज तुळजाभवानी नगर मधील या हिंदीत दीडशे ते दोनशे भाविक सहभागी होतात तसेच आज माझी पोलीस श्री नारायण जी मोरे व त्यांच्या सुविद्या पत्नी शशिकलाबाई मोरे यांनी दिंडीमध्ये विना घेऊन व डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन आज तुळजाभवानी नगर मध्ये एकादशीच्या दिंडीमध्ये सहभाग नोंदीला या दिंडीमध्ये वयोवृद्ध महिला व पुरुषांचा सहभाग जास्त प्रमाणात असतो एकादशीच्या दुसऱ्या दिवशी महा प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या एकादशीच्या महाप्रसादाचा मान श्री नारायणजी मोरे यांना मिळालेला असून त्यांच्या वतीने लक्ष्मी माता मंदिर तुळजाभवानी नगर या ठिकाणी हा महाप्रसादाचा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक या प्रसादाचा लाभ घेत असतात ही परंपरा बऱ्याच वर्षापासून चालू केलेली आहे या एकादशी दिंडीमध्ये सहभाग नाराजी मोरे व शशिकलाबाई मोरे यांचा सुरुवातीपासूनच आहे प्रत्येक एकादशीच्या महाप्रसादाचा मान वेगवेगळ्यांना मिळतो व मोठ्या उत्साहाने दुवादशी ला हा भोजनाचा कार्यक्रम पार पडतो यामध्ये यांचा पूर्ण सहभाग असतो या महाप्रसादावेळी तुळजाभवानी नगर मधील नागरिक व तरुण मंडळी दिवसभर सहभागी असतात तुळजाभवानी नगर मधील सर्व नागरिकांच्या घरासमोर सडा रांगोळी काढला जातात घरासमोर आलेल्या दिंडीची तुलसी पूजन केले जाते दिंडीतील महिला व पुरुष टाळ व विना वाजून भारुड भजन व भावगीत गाऊन नगर प्रदक्षिणा करून दिंडी तुळजाभवानी मंदिरामध्ये विराजमान होते. जसे पंढरपूरला भक्तांचा गजर असतो तशाच पद्धतीने एकादशीच्या निमित्ताने या तुळजाभवानी नगर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो .