आशाताई बच्छाव
भिलदरी शिक्षण संस्थेच्या वतीने राष्ट्रीय सेवा पुरस्कार प्राप्त ज्ञानेश्वर टेकाळे सर यांचा सत्कार
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक २४/०५/२०२५
राष्ट्रवादी शिक्षक संघाचे मार्गदर्शक डॉ . सुखदेव मांटे सर व भिल्लदरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. रेवतीताई मांटे यांनी राष्ट्रीय सेवा पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल ज्ञानेश्वर टेकाळे सर यांचा सत्कार केला.ज्ञानेश्वर टेकाळे यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी बजावली असून त्याचीच भेट म्हणून त्यांना राष्ट्रीय सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे श्री सुखदेव मांटे सरांनी सांगितले. याप्रसंगी संस्थाचालक व मा . मुख्याध्यापक इंद्रजीत जाधव सर , राष्ट्रवादीचे प्रकाश बांडगे सर , पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव देशमुख सर , संजय जोमदे सर मंगेश वारे सर आदींची उपस्थीती होती.






