आशाताई बच्छाव
लोखंडी कोयता बाळगणाऱ्या एकावर चाळीसगाव पोलिसांची कारवाई
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – शहरातील भडगाव रोड वरील माता रमाबाई आंबेडकर नगर परिसरात हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एकास चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली असून त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
04/05/2025 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास भडगाव रोड वरील माता रमाबाई आंबेडकर नगर परिसरात हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाल्यावर त्यांच्या नेतृत्वात
पोहेकॉ अजय अशोक पाटील व पोना भुषण मांगो पाटील यांनी घटनास्थळी जावून दादाभाऊ वाल्मिक अहिरे 30 रा. भडगाव रोड, माता रमाबाई आंबेडकर नगर, चाळीसगाव यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे सुमारे 300 रुपये किमतीचा लोखंडी कोयता मिळून आला.
त्याच्याकडे सदर शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना मिळून आला नाही. जिल्हाधिकारी, जळगाव यांनी लागू केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करीत असताना तो मिळून आला म्हणून त्याचे विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार पंकज पाटील करीत आहेत.