आशाताई बच्छाव
गडचिरोली नगरपरिषदेच्या पाणी शुद्धीकरण केंद्र व डम्पिंग यार्डची पाहणी
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ : गडचिरोली नगरपरिषद अंतर्गत कार्यरत पाणी शुद्ध प्रक्रिया केंद्राची पाहणी करून केंद्राच्या कार्यपद्धतीचा व गुणवत्ता व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने काय नवीन उपाययोजना करता येतील यावर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
त्यानंतर शहरातील डम्पिंग यार्ड येथे भेट देऊन त्या ठिकाणी असलेल्या सुविधांचा व अडचणींचा आढावा घेतला. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक बदल व सुधारणा करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
या पाहणी दौऱ्यादरम्यान माझ्यासोबत भाजपा शहराध्यक्ष श्री. अनिलजी कुनघाटकर, श्री. अविनाशजी विश्रोजवार, परमानंद पुन्नमवार, नगरपरिषद चे अभियंता श्री. अंकुशजी भालेराव तसेच इतर सहकारी उपस्थित होते.
शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी सातत्याने काम सुरूच राहील.