आशाताई बच्छाव
नम्रता वृद्धाश्रम वर्धापन व महाराष्ट्र दिन महिला अधिकार सामाजिक संघटनेतर्फे घोटी गोरेगाव येथे युट्युब न्यूज चैनल चे उद्घाटन
संजीव भांबोरे
गोंदिया –गोरेगाव तालुक्यातील नम्रता वृद्धाश्रम घोटी येथे 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त , व नम्रता वृद्धाश्रम च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटनेच्या वतीने युट्युब चॅनेल चे नम्रता बागडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून सदानंद धारगावे संस्थापक नम्रता वृद्धाश्रम घोटी गोरेगाव , नम्रता बागडे अध्यक्षा महिला अधिकार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य, अंकुश चव्हाण बुलढाणा अर्बन बँक गोरेगाव बँक मॅनेजर , शोभना सरोजकर अध्यक्षा विदर्भ महिला सामाजिक संघटना, वैशाली रामटेके भंडारा जिल्हाध्यक्ष महिला सामाजिक संघटना,सुधाकर भेलावे ,सुजित जांभुळकर, पूजा पाटील,सीमा काळे भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मान्यवरांनी वृद्ध महिला व पुरुषांबाबत योग्य मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरता करण्याकरता मायाताई जांभुळकर, प्रीती कांबळे, पोर्णिमा खांडेकर रंजू रामटेके रंजना साखरे सुनिता खोब्रागडे,प्रिया राऊत ,गनिता भेंलावे, जया कुमार, शिल्पा मेश्राम ,लीला भेलावे ,मंगला नंदेश्वर, अनिता मेश्राम, संध्या गजभिये ,मंगला गेडाम, भूमिका मेश्राम छाया कोटांगले, यांनी सहकार्य केले सदर कार्यक्रमात महिला सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांचा भीम गीतांचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाचे संचालन सदानंद धारगावे यांनी केले तर आभार नम्रता बागडे यांनी मानले.