आशाताई बच्छाव
मौजा भोजापुर येथील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त गट क्रमांक 199 व इतर गटांची पुनर्वसन संबंधी त्वरित कायदेशीर कारवाई संयुक्त मोजणी करावी
प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन व बैठक
संजीव भांबोरे
भंडारा – शहरालगत लागून असलेल्या मौजा भोजापुर येथील गोसे खुर्द प्रकल्पग्रस्त क्षेत्र गट क्रमांक 199 व इतर गटांची पुनर्वसन संबंधित त्वरित कायदेशीर कारवाई संयुक्त मोजणी करण्यात यावी याबाबत जिल्हाधिकारी भंडारा यांच्यासोबत 29 मे 2025 ला सायंकाळी 4 वाजता बैठक घेण्यात आली .याबाबत सविस्तर वृत्त असे की ,मौजा भोजापुर तालुका भंडारा येथील गट क्रमांक 199 अपूर्वा नगर 197 ,218 व 228 हे क्षेत्र गोसेखुर्द
प्रकल्पाच्या संचय पातळी 246 मीटर खाली बाधित होतात .आणि 1996, 1997 अधिसूचनेनुसार व 2024 च्या सर्वे मध्ये गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये अति बाधित होतात. आणि त्या सर्वेनुसार शासनाला मौजा भोजापुर येथील एकूण 20. 62 हेक्टर जमीन संपादित करायची होती परंतु प्रत्यक्षात 2016, 17 पर्यंत 12.95 हेक्टर आर जमीन वाटाघाटी द्वारे संपादित केली. उर्वरित जमीन बाधित असूनही शासन व प्रशासन संपादित करण्या टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे .तसेच गट क्रमांक 109 हे गट खालच्या पाणी पातळीत असून सदर क्षेत्र अगोदर अतीबादीत होतो. परंतु गट क्रमांक 197 हे वरच्या पाणी पातळीत असूनही त्याला संपादित करून भोजापूर वासियांवर अन्याय केला जात आहे हे 2016, 17 च्या संपादन इ तक्ता नुसार स्पष्ट होते .
गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणी पातळीमुळे सदर क्षेत्रात सतत दल दलअसते .घरांच्या भिंतींना भेगा पडले असून घरांची पडझड होण्याची शक्यता आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचे जल स्त्रोत दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. तसेच पाण्यामुळे येणाऱ्या कीटकनाशकांपासून विषाणू व जिवाणू पासून विविध त्वचा रोग व इतर आजार पसरत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक, शारीरिक, व मानसिक नुकसान होत आहे .तसेच सदर क्षेत्रात काटेरी झाडे झुडपे वाढलेले असून हिस्त्र प्राण्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे सदर क्षेत्रातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे .आणि ही बाब ग्रामपंचायतच्या ग्रामसभेतील ठरावा द्वारे शासन व प्रशासन यांच्या निदर्शनास वेळे वेळी आणून दिले व आमच्या गावचे पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे अशी कायदेशीर मागणी केलेली आहे.संबंधित कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार करून व आंदोलन करून प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिलेले आहे .त्यामुळे मौजा भोजापुर तालुका जिल्हा भंडारा येथील गोसे खुर्द प्रकल्प बाधित अन्यायग्रस्त गट क्रमांक व इतर गटांची संयुक्त मोजणी करून पुनर्वसन भूसंपादन त्वरित कारवाई करावी व आमच्या भोजापुर गावचे भूसंपादन कायदा 2013 चा 30 नुसार करण्यात यावे. जिल्हाधिकारी भंडारा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये मनीषा भांडारक, भाऊ कातोरे,स्नेहा साखरवाडे ,माधुरी साठवणे ,योगिता धांडे ,श्यामला कोहपरे ,रजिया पठाण ,धनंजय मुलकरवार ,नथुजी ठेंगे ,चंद्रप्रकाश धुर्वे ,रविकिरण निमजे , यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.






