Home भंडारा टेकेपार/माडगी येथे ग्रामस्तरीय हवामान अनुकूल आराखडा कार्यक्रम

टेकेपार/माडगी येथे ग्रामस्तरीय हवामान अनुकूल आराखडा कार्यक्रम

99

आशाताई बच्छाव

1001457979.jpg

टेकेपार/माडगी येथे ग्रामस्तरीय हवामान अनुकूल आराखडा कार्यक्रम

कृषी सहाय्यक देवानंद जवंजार यांचे ग्रामस्थांना मार्गदर्शन

संजीव भांबोरे
भंडारा –तालुक्यातील धारगाव जिल्हापरिषद क्षेत्रातील गाव टेकेपार/माडगी येथे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा -2 अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन आराखडा दिनांक 28 एप्रिल ते 02 मे 2025 या कालावधीमध्ये मशाल फेरी, शिवारफेरी, गाव बैठक, मौजा टेकेपार येथे आयोजित करण्यात आली.

त्याची सुरुवात गाव बैठक घेऊन मशाल फेरीने करण्यात आली असून कार्यक्रमाला उपस्थित सरपंचा सौ.स्मिता चवळे, उपसरपंच इरफान पटेल, माजी जि.प.सदस्य निलकंठ कायते, गणेश चेटूले माजी सरपंच , कृषि सहाय्यक देवानंद जवंजार, दत्तराज हातेल सर , समूह सहायक नेहल उरकुडकर, वामन शेंडे कृषि मित्र, शिशुपाल चेटुले वि.का.स.सेवा.संस्था अध्यक्ष, महादेव चेटूले माजी पोलीस पाटील, शरद कायते ग्राम.शिपाई, उत्तम सिडामे , धनराज कायते , ईस्तारी काहलकर, यशवंत लांडगे ग्राम कृषि विकास समिती सदस्य, स्वयंसेवक,नरहरी चेटुले, मुन्ना चेटुले स्वयंसेवक, सीआरपी सावित्री कायते , प्रिया रामटेके कृषि सखी , आशा कायते , गावातील शेतकरी, भूमिहीन शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या योजनेमधून गावातील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, भुमिहीन शेतकरी या सर्व घटकानी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन कृषि सहाय्यक देवानंद जवंजार यांनी केले आहे.

मनोगत
कर्तव्यदक्ष कृषि सहाय्यक देवानंद जवंजार यांच्या मार्गदर्शनात टेकेपार/माडगी गाव कृषि उत्पादनात प्रगतीपथावर असून शेतकऱ्यांची शेतीकडे ओढ निर्माण होत आहे, सरकारचे येणारे सर्वच कार्यक्रम ते यशस्वीरित्या राबवत असतात. अशा कार्यक्रमांमुळे शेतकरी जागरूक होत असतात.
-निलकंठ कायते, माजी जि.प. सदस्य