Home नांदेड वंडगीर येथील अभिषेक चे एम बी बी एस शिक्षण पुर्ण {पहिल्यांदाच वंडगीर...

वंडगीर येथील अभिषेक चे एम बी बी एस शिक्षण पुर्ण {पहिल्यांदाच वंडगीर गावचा मुलगा झाला MBBS डॉक्टर }

44
0

आशाताई बच्छाव

1001452901.jpg

वंडगीर येथील अभिषेक चे एम बी बी एस शिक्षण पुर्ण

{पहिल्यांदाच वंडगीर गावचा मुलगा झाला MBBS डॉक्टर }

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे 

आनंदराव निवृत्तीराव पाटील राहणार वंडगीर तालुका मुखेड, जिल्हा नांदेड यांचा मुलगा अभिषेक आनंदराव पाटील हा वंडगीर गावचा पहिला एम बी बी एस डॉक्टर बनला. कष्टाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. घरची परिस्थिती सामान्य असून वडील शेतकरी व आई गृहणी आहे. त्याच्या या यशामागे त्याचे आई वडील व मामा, मामी तसेच त्याचे संपूर्ण कुटुंबाचे ही
त्याला सहकार्य भेटलेले आहे.
अभिषेक चे शिक्षण पहिली ते सातवी श्री छत्रपती संभाजी शाळा मुक्रामाबाद व आठवी ते दहावी विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर या ठिकाणी झाला आहे. अकरावी व बारावी दयानंद कॉलेज लातूर येथे झाले. कोविड काळात सुद्धा ज्यावेळी सर्व लोक कामधंदा सोडून घरात होते त्या काळात सुद्धा त्यांनी जिद्दीने व मेहनतीने कष्ट करून एम बी बी एस ची तयारी चालूच ठेवली व त्याला हे फळ मिळाले. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल गावकऱ्यांनी येथोचित्त सत्कार केला. तसेच त्यांच्या पाहुण्यांनी व त्याची बहीण स्नेहा भाऊ ओमकार व जावई शेखर (इंजिनिअर) यांनी ही अभिषेकचे भरभरून कौतुक केले.
कुटुंबीयांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. त्याच्या या यशाबद्दल श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे संचालक व्यंकटराव पाटील गोजेगावकर, श्रीनिवास पाटील गोजेगावकर, गजानन पाटील गोजेगावकर,मुख्याध्यापक श्री भाहेगावे सर, खंकरे सर,त्याचे कौतुक केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here