आशाताई बच्छाव
शिंदखेड्यात भारतीय जैन संघटनेच्या जलप्रचार रथाचा तहसीलदारांच्या हस्ते शुभारंभ
विरदेल प्रतिनिधीःराकेश बेहेरे पाटील.
शिंदखेडा तालुक्यातील जैन संघटनेचा प्रचार रथाचा शुभारंभ दिनांक २५. एप्रिल २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता तहसीलदारअनिल गवांदे यांच्या हस्ते तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नारळ वाढवून करण्यात आला.
या प्रसंगी तहसीलदार गवांदे म्हणाले, गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. ही योजना गावा गावात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्या साठी तसेच मागणी. अर्ज निर्माण करण्यासाठी भारतीय जैन संघटना सज्ज झाली आहे. या योजनेचा फायदा तालुक्यातील सर्व गावांनी घेऊन, सरपंचांनी ऑनलाइन अर्ज भरायचा आहे भारतीय जैन संघटनेच्या या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा.
जिल्हा जलप्रकल्प प्रमुख प्रा. चंद्रकांत डागा म्हणाले, संघटनेन तयार केलेला प शासनाने स्वीकारला असून, त्यामध्ये सरपंच, ग्रामसेवक व संबंधित अधिकारी यांच्या स्वाक्षरीने तो भरायचा आहे. तसेच संघटनेने तयार केलेल्या पोस्टर्स, पॅम्प्लेट मध्ये क्यू आर कोड दिला असून तो स्कॅन केल्यावर योजनेची सर्व माहिती व ही डाऊनलोड करता येईल. तलावातील गाळ काढण्यासाठी एनजीओ मिळत नसेल तर ते काम आता ग्रामपंचायत करू
शकेल. यासाठीचा निी जिल्हाधिका ऱ्यांकडे आला आहे. तसेच तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी अल्पभूधारक अत्यल्प भूधारक विधवा विकलांग व आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदान मिळणार आहे तरी या योजनेच्या जास्तीत जास्त लाभघेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी विरोधी नगरपंचायत नेते सुनील चौधरी, तालुका जलप्रकल्प प्रमुख अशोक राखेचा स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष सजनराज कवाड, मुर्तीपूजक संघाचे अध्यक्ष रमेश टाटिया, भागचंद कर्णावट, दिलीप कर्नावट, मयुर पवारआदी उपस्थित होते. बीजेएस ला सुहाना स्पाईसेस चेंसहकार्य मिळत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.