आशाताई बच्छाव
जिल्ह्यात मिरची संशोधन केंद्र व केळी क्लस्टर उभारण्यावर भर
दिशा समितीच्या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा व सूचना
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड दि. 24 एप्रिल : जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. योजना, उद्दीष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावेत, असे निर्देश खासदार रविंद्र चव्हाण यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज दिशा समितीच्या बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार शिवाजी काळगे, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार राजेश पवार, आमदार भिमराव केराम, आमदार आनंदराव तिडके, आमदार श्रीजया चव्हाण , जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.
बैठकीत सुरवातीला 3 जुलै 2023 रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले व त्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या विविध योजनेच्या कामाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. डीजीटल योजना यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात इंटरनेट सुविधा तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर स्थापन करण्याबाबत, महामार्गाच्या पायाभुत सुविधा, दूरसंचार पायाभूत सुविधा कार्यक्रम, खाण पायाभूत सुविधा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरी, वैयक्तिक सिंचन विहिरी, दिनदयाळ अंत्योदय योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, मध्यान्ह भोजन योजना, एकात्मिक बालविकास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम, अमृत मिशन 2.0, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, सर्व शिक्षा अभियान या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. अध्यक्ष खासदार रविंद्र चव्हाण यांनी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावाणीसाठी संबंधित यंत्रणेने त्वरीत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी भागातील रस्ते, पिण्याचे पाणी, विद्युत विषयक समस्या, शहरातील स्वच्छता, वाहतुक समस्या, रेल्वे विषयक समस्या, शहरातील पार्कींगची समस्या, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज लाईन, आरोग्य, शहर बस सेवा, गोदावरी नदी स्वच्छता इत्यादी विषयावर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना विचारणा करुन यावर उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या.
यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी मार्च 2026 पासून शहराला दररोज पाणी पुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. तसेच मल्टी पार्कीग साठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नांदेड शहरात अधिकची स्मशान भूमी उभारण्यात यावी. तसेच आरोग्य उपकेंद्र नायगावला स्थलांतर करणे, केळी उद्योग, मिर्ची संशोधन केंद्र उभारण्यावर भर देण्यात येईल अशी मागणी सर्वानुमते यावेळी करण्यात आली. तसेच कासराळी येथे मिरची व सोयाबीन, अर्धापूर शिवारात केळी क्लस्टर उभारण्याबाबत मागणी करण्यात आली. बैठकीत अनुषंगीक योजना तसेच त्यातील कामा बाबत अहवाल संबंधीत यंत्रणांनी सादर केला. त्यावर उपस्थित समिती सदस्यांनी विविध मुद्यांवर चर्चा करुन उपयुक्त सूचना केल्या. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले व शेवटी आभार मानले.