आशाताई बच्छाव
कै. नारायणराव चिद्रावार व्याख्यानमालेत
डॉ. सुधीर गव्हाणे यांचे व्याख्यान.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर
नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजातील नेते, देगलूरचे माजी नगराध्यक्ष , अनेक सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्थेचे संस्थापक कै. नारायणराव चिद्रावार यांच्या ३७व्या स्मृतीदिनानिमित्त यावर्षी २ मे २०२५ रोज शुक्रवारी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेचे यंदाचे पुष्प सुधीर गव्हाणे सुप्रसिद् वक्ते व माजी कुलगुरु , य. च. म. मुक्त विद्यापीठ हे “लोकशाही व समाज परिवर्तन ” या विषयावर गुंफणार आहेत, सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून खासदार प्रा. रविन्द्र चव्हाण, राज्यसभा खासदार डॉ. अजीत गोपछडे, नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डीले व मा.आ. जितेशजी अंतापुरकर (देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघ) या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या व्याख्यानमालेचे ३८ वर्षे पूर्ण झाले असून यंदाचे ३९ वे वर्ष आहे. महाराष्ट्रातील थोर विचारवंत राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यीक यांचे विचार लोकांपर्यंत जावेत व या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य व्हावे या सदहेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या वर्षी ०२ मे २०२५ शुक्रवार रोजी सायंकाळी ०७:०० वा. देगलूर येथील नगरेश्वर मंदिर प्रांगण येथे आयोजित केला आहे. सर्व मान्यवरांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे वाहन कै. नारायणराव विद्रावार स्मृती व्याख्यानमालेच्या संयोजकांनी केले आहे.