आशाताई बच्छाव
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या
राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा परीक्षेचा निकाल जाहीर
संजीव भांबोरे
भंडारा- ध्येयानिष्ठ अधिकारी ग्रुप महाराष्ट्र तर्फे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा शुक्रवार (दि. 18) दुपारी12 वाजता घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल रविवारी (दि. 20)रात्री 8 वाजता जाहीर करण्यात आला.यात 3001 रुपयांचे प्रथम बक्षीस मंजुषा चन्ने( गडचिरोली ), 2001 रुपयांचे द्वितीय बक्षीस वैभवी नैताम (चंद्रपूर ), 1001 रुपयांचे तृतीय बक्षीस आचल नागदेवते (चंद्रपूर ), 501 रुपयांचे चथुर्थ बक्षीस ऋषिकेश तांडेकर (चंद्रपूर ),251 रुपयांचे पाचवे बक्षीस कल्याणी लिहीतकर (चंद्रपूर ) तर 125 रुपयांचे सहावा बक्षीस सचिन काळे (अमरावती )यांना देण्यात आले.या स्पर्धेचे परीक्षण व आयोजनासाठी परवेश मेश्राम (ध्येयनिष्ठ अधिकारी ग्रुप महाराट्र ),लक्ष्मीकांत दुर्गे (PSI हिंगणाघाट, वर्धा ), जीवनप्रकाश गेडाम (सहायक शिक्षक राजुरा, चंद्रपूर ), अक्षय देशमुख ( वेद्यकीय /मन :चिकीस्तक सा. कार्यकर्ता, भारत लिंगे ( स्वच्छता उत्पादन उद्योग )आणि दिनेश मंडपे यांनी परिश्रम घेतले.